IPL Final: पंजाबच जिंकणार! प्रसिद्ध गायकाने लावली तब्बल 3 कोटींची पैज, स्वतः दिली माहिती

0

[ad_1]

IPL 2025 : प्रसिद्ध गायक करण औजलाने आयपीएल 2025 च्या फायनलसाठी तब्बल 3 कोटी रुपयांची जोखीम उचलली आहे. मंगळवारी ‘तौबा तौबा’ या प्रसिद्ध गाण्याच्या गायकाने स्वतः सोशल मीडियावर स्टोरी ठेऊन याबाबतचा खुलासा केला. गायकाने पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यापूर्वी पंजाब किंग्स संघ जिंकणार असं म्हणत तब्बल 3 कोटींची बोली लावली आहे. 

गायक करण औजलाने एक स्क्रीनशॉट  सांगितले की  त्याने फायनल सामन्यात पंजाब किंग्सवर CA$500,000 ची पैज लावली आहे. CA$500,000 भारतीय रुपयांमध्ये 3,11,15,000 रुपये होतात. कॅप्शनमध्ये करण औजलाने लिहिले की, ‘लेट्स गो पंजाब’. यापूर्वी हा सुद्धा खुलासा झाला होता की  प्रसिद्ध रॅपर ड्रेकने सुद्धा आरसीबीवर 2025 च्या आयपीएल फायनलमध्ये पंजाब किंग्सच्या विरुद्ध विजयासाठी $750,000 ची पैज लावली होती. 

हेही वाचा : IPL 2025 Final : फायनलपूर्वी अहमदाबाद स्टेडियमजवळ लागली आग, सिलेंडरचा झाला स्फोट

 

ipl

ग्रॅमी अवॉर्ड विजेत्या गायकाने इंस्टाग्रामवर खुलासा स्क्रीन शॉट शेअर केला. या स्क्रीनशॉटमध्ये त्याने लावलेल्या पैजेची रक्कम सुद्धा दिसतेय. यावर त्याने आरसीबी संघाचा प्रसिद्ध नारा ‘ई साला कप नमदे’ सुद्धा लिहिला आहे. यासह त्यांनी Stake ला सुद्धा टॅग केले. 2022 पासून ते क्रिप्टो स्पोर्ट्स बेटिंग प्लॅटफॉर्मला सपोर्ट करतात. जर आरसीबी ट्रॉफी जिंकली तर गायक पैज जिंकेल आणि त्याला $1,312,500 रुपये मिळतील. 

करण औजला कोण आहे?

करण औजला एक प्रमुख भारतीय रॅपर, गायक आणि गीतकार असून तो कॅनडामध्ये राहतो. पंजाबी संगीत उद्योगातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्याला ओळखले जाते. ‘डोंट वरी’, ‘झांझर’ आणि’ क्या बात आ’ सारख्या लोकप्रिय गाण्यांमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. करणने दिलजित डोसांझ सारख्या उल्लेखनीय कलाकारांसोबतही काम केले आहे . गेल्या वर्षी, ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले, जे यूट्यूबवर 471 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here