[ad_1]
Dark Private Part : गोरा असो किंवा सावळा, पुरुष असो किंवा स्त्री यांचे गुप्तांगाजवळील त्वचा ही काळी असते. या काळा त्वतेची अनेक लोकांना लाज वाटते. जोडीदारासमोर जाताना ते मागेपुढे पाहतात. अशावेळी मार्केटमध्येही अनेक प्रकारच्या क्रीम आल्या आहेत, ज्या गुप्तांगाजवळील त्वचा गोरी करण्याचे दावे करतात. पण ही क्रीम गुप्तांगाजवळील त्वचेला लावणे योग्य आहे का? त्यामुळे आरोग्यास कुठला धोका तर नाही? असे प्रश्नही उपस्थितीत होतात. याबद्दल डॉक्टर काय सांगतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी प्राइव्हेट पार्ट जवळची जागा काळी का असते याबद्दल पहिला पाहूयात.
प्राइव्हेट पार्ट काळं होण्याचं कारण काय?
डॉ. मनन व्होरा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या त्यांनी गुप्तांग काळे असण्यामागील कारण सांगितलं आहे. ते म्हणतात की गुप्तांग काळे असणे म्हणजे तुम्ही स्वत:ची किंवा गुप्तांगाची योग्य स्वच्छता किंवा काळजी घेत नाही. तुमच्या गुप्तांगाजवळील त्वचा शरीराच्या इतर भागांपेक्षा अनेकदा गडद असते. हे हार्मोन्स, घर्षण आणि नैसर्गिक रंगद्रव्यामुळे घडतं. पण खरी समस्या तेव्हा सुरु होतं ज्यावेळी लहानपणापासूनच, आपल्याला फिल्टर केलेले फोटो, प्रौढ सामग्री आपण पाहतो, ज्यामुळे आपले शरीर कसे दिसावे याचा एक बनावट आदर्श आपल्या डोळ्यासमोर न कळत उभा राहतो.
प्राइव्हेट पार्ट काळं असणे गैरनाही!
डॉ. व्होरा पुढे म्हणाले, “आपण गोरा जननांगांवर विश्वास ठेवू लागलो आहोत, ही गैरसमज आपल्याला लाज वाटते. बऱ्याच महिला आणि पुरुषांनाही असुरक्षित वाटते. बरेच लोक यामुळे जवळीक टाळतात, अनेकांना काळजी वाटते की त्यांचा जोडीदार त्यांच्या खालच्या नजरेवरून त्यांचा न्याय करेल.”
मार्केटमधील क्रीमचा वापर करावा की नाही?
डॉ. व्होरा यांनी शेवटी स्पष्ट केलंय, “दुर्दैवाने या लाजेवर पैसे खर्च केले गेले आहेत, कंपन्या तुम्हाला त्वचा पांढरी करणारी क्रीम, जननेंद्रियाला पांढरी करणारी उत्पादने विकतात, जी बहुतेकदा अनावश्यक आणि हानिकारक रसायनांनी भरलेली असतात. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण वैद्यकीयदृष्ट्या याची अजिबात गरज नाही. हे संवेदनशील त्वचेला नुकसान करू शकतं. म्हणून समजून घ्या की तुमच्या खाजगी भागांभोवती काळी त्वचा ही दोष नाही आणि ती दुरुस्त करण्याची गरज नाही.”
[ad_2]