खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून बोधेगावच्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न 

0

राहुरी तालुक्यातील सहा सावकारा विरोधात गुन्हा दाखल, एका सावकारास अटक

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :

               खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून राहुरी फँक्टरी येथिल आप्पा थोरात गेल्या नऊ दिवसा पासुन पसार असुन अद्याप त्यांचा शोध लावण्यात पोलीसांना यश आले नाही.तोच राहुरी तालुक्यातील बोधेगाव येथिल शेतकरी प्रविण गोरक्षनाथ बेंद्रे याने खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून विषारी औषध घेवुन जीवन याञा संपविण्याचा प्रयत्न केला. खाजगी सावकाराचे पैसे फेडण्यासाठी शेती विकली.तरी हि सावकाराचे पैसे फिटत नसल्याने व  खाजगी सावकाराचा जाच सुरुच असल्याने  खाजगी सावकारा विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवळाली प्रवरा येथिल दोन, करजगाव तीन, उंबरे येथिल एका सावकारा विरोधात गुन्हा दाखल करुन  एका सावकारास अटक करण्यात आली आहे.

            याबाबत सविस्तर माहिती अशी की,बोधेगाव ता.राहुरी येथिल शेतकरी प्रविण गोरक्षनाथ बेंद्रे याने खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून विषारी औषधे सेवन करुन जीवन याञा संपविण्याचा प्रयत्न केला आहे.त्याच्यावर श्रीरामपूर येथिल कामगार हाँस्पीटल मध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे गेल्या आठ दिवसा नंतरही तो शुद्धीवर आलेला नाही.प्रविण बेंद्रे याचा भाऊ संदीप गोरक्षनाथ बेंद्रे याने राहुरी पोलीस ठाण्यात खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून विषारी औषध घेवुन जीवन याञा संपविण्याचा प्रयत्न केला असुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सहा खाजगी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                याबाबत पोलीस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, बोधेगाव ता.राहुरी येथिल तरुण शेतकरी प्रविण गोरक्षनाथ बेंद्रे याने खाजगी सावकाच्या जाचास कंटाळून जीवन याञा संपविण्याचा प्रयत्न केल्या बद्दल खाजगी सावकारां विरोधाता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेंद्रे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संदीप बेंद्रे याने सन 2021 मध्ये खाजगी सावकार  तुकाराम भिमराज पठारे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) श्याम पोपट कोतकर (रा. करजगाव ता. राहुरी) यांच्याकडून शेती कामासाठी व माझे पत्नीच्या दवाखान्यासाठी मे 2021 मध्ये दोन लाख रुपये तुकाराम पठारे व श्याम कोतकर यांच्या सांगण्यावरुन  सोमनाथ भीमराज भागवत (रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी ) यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले तसेच उंबरे ता. राहुरी येथिल खाजगी सावकार  राजू मच्छिंद्र गायकवाड यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. या सावकारांचे आज पर्यंत शेतीचे तसेच दुधाचे पगाराचे ॲडव्हान्स घेवून व  शेती जमिन विकून पत्नीचे दागिने मोडून नातेवाईकांकडून उसने पासने करुन  तीन लाखाचे व्याजासह 36 लाख रुपये दिले आहेत.  राजू मच्छिंद्र गायकवाड यास दोन लाखाचे  व्याज व मुद्दल पोटी आठ लाख रुपये रोख व फोन पे द्वारे दिलेले आहे.तरीही खाजगी सावकाराची रक्कम फिटत नसल्याने खाजगी सावकाराचा जाच वाढत गेला.करजगाव ता.राहुरी येथिल खाजगी सावकार  शुभम पोपट कोतकर व इतर तीन अज्ञात इसम सदर व्यक्तींनी  संगणमत करून वेळोवेळी मला व माझ्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन माझ्या घरात  बळजबरीने शिरुन कपाटातून कोरे चेक घेऊन त्यावर माझ्या सह्या  घेतल्या. रस्त्यामध्ये वेळोवेळी अडवून बळजबरीने गाडीत घालून घेऊन जाऊन शेत जमिनीचे साठे खत करून घेतले तसेच मला माझ्या मोबाईल फोनवर जीवे ठार मारण्याची धमकी देत आहे. तुझ्यावर  खोटी ॲट्रॉसिटी व अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचे  पोक्सो सारखा  खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन व्याजाच्या पैशासाठी दमदाठी करीत आहे.

            संदीप बेंद्रे यांच्या मोठ्या भाऊ प्रवीण गोरक्षनाथ बेंद्रे यांने  तुकाराम भीमराज पठारे यांच्याकडून सन 2015 मध्ये 3 लाख रुपये 40 टक्के दराने प्रति महिणा  व्याजने  घेतले होते. त्या बदल्यात त्याने माझी मोठी भावजयी मोहिनी प्रवीण बेंद्रे हिच्या नावावरील  करजगाव तालुका राहुरी येथील शेत गट नंबर 96/1 ही एक एकर जमीन शुभम पोपट कोतकर व साहेबराव निवृत्ती कोतकर यांच्या नावावर व्याजापोटी जबरदस्तीने करून घेतली.जमिन नावावर करण्यापुर्वी माझ्या भावाने तुकाराम भिमराज पठारे  यांना व्याज व मुद्दल पोटी लाखो रुपये दिले आहे.तरी हि सावकाराचे कर्ज जैसे थे असल्याचे सावकाराने सांगितले. पैशाची मागणी करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे  प्रविण बेंद्रे या तरुण शेतकऱ्यांने आठ दिवसापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

                   राहुरी फँक्टरी  येथिल आप्पा थोरात हा गेल्या नऊ दिवसा पासुन खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून पसार झाला आहे.आप्पा थोरातच्या प्रकरणाला वृत्तपञाने वाचा फोडल्या नंतर पोलीसांनी तात्काळ थोरात कुटुंबाची भेट घेवून जाब जबाब नोंदवले आहे या जाब जबाबातून सहा खाजगी सावकारांचे नावे समोर आली आहेत.थोरात याचा तपास लावण्यात पोलीसांना अपयश आले आहे.आणि त्या सहा सावकारांविरोधातही अद्याप पोलीसांनी ठोस पावले उचलली नसल्याने  खाजगी सावकारा विरोधात खरोखर कारवाई होईल का? असा प्रश्न थोरात कुटुंबाने पोलीसांना केला आहे.

            बोधेगाव येथिल प्रविण बेंद्रे याने विषारी औषध घेवून जीवनयाञा संपविण्याचा प्रयत्न केल्यामुळे राहुरी पोलीस ठाण्यात खाजगी सावकार तुकाराम भिमराज पठारे,सोमनाथ भीमराज भागवत (दोघे रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी),राजू मच्छिंद्र गायकवाड(रा.उंबरे ता.राहुरी),श्याम पोपट कोतकर व शुभम पोपट कोतकर,साहेबराव निवृत्ती कोतकर (सर्व रा.करजगाव ता.राहुरी)यांच्या विरोधात गुन्हा रं.नं.578/2023भा द वि कलम  327,341,386,387,34,452,504,506, 507 सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39, 40,42,43, 44,46 प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला. तुकाराम भिमराज पठारे या खाजगी सावकारांस रविवारी राञी उशिरा ताब्यात घेतले आहे.

             पुढील तपास पौलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here