कोपरगाव : संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने श्री गणेशनगर सहकारी साखर कारखाना नवनिर्वाचित चेअरमन,व्हा चेअरमन व संचालक यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या शुभहस्ते व सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष आणि श्री गणेश निवडणुकीत आपला नेतृत्वाचा करिष्मा दाखवणारे युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी संजीवनी दूध डेअरी येथे पार पडला.
या प्रसंगी बोलताना बिपीनदादा कोल्हे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी,संचालक यांचे अभिनंदन केले.मी श्री गणेश कारखाना कार्यभार पाहिलेला असून आजही त्या ठिकाणी साहित्य आढळून येईल.स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी गणेश परिसरावर प्रेम केले त्याच भावनेने अदृश्य हात श्री गणेश निवडणुकीत पुढे आले. असे बिपीनदादा कोल्हे म्हणाले.याप्रसंगी बोलताना त्यांनी आपण निवडणुकीत सक्रिय झालो नाही कारण सिंहाचा छावा जनतेने डोक्यावर घेतला त्यामुळे आवश्यकता भासली नाही मात्र आगामी काळात कितीही आव्हाने समोर असली तरीही कारखाना टिकवण्यासाठी मी सहकार्य करणार असे कोल्हे म्हणाले.
मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी निवडूक काळात आलेले अनुभव सांगताना स्व.कोल्हे साहेब यांनी जोडलेले कार्यकर्ते किती अभ्यासपूर्ण आजही प्रश्न मांडतात,पाणी प्रश्नावर ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभावी विचार मांडतात याचे कौतुक वाटते.लढणारे आणि भिडणारे कार्यकर्ते स्व.कोल्हे साहेबांच्या समवेत होते आणि हीच ताकत मला ऊर्जा देणारी आहे असे त्या म्हणाल्या.कुणाच्या अन्नात माती कालवनारे आम्ही नाही तर अन्नदात्यांची काळजी घेणारे कोल्हे कुटुंब आहे.कोल्हे परिवाराला पाठीत खंजीर खुपसन्याची सवय नाही त्यामुळे श्री गणेश निवडणुकीत जो सभासद आणि शेतकरी यांचा विचार होता की त्यांना परीवर्तन हवे होते तो मार्ग निवडून विवेकभैय्या या निवडणुकीत सक्रिय झाले त्यासाठी मी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती त्यासाठी त्यांनी सहकारात लोकशाही मार्गाने संस्था टिकल्या पाहिजे यासाठी सकारात्मक निर्णय दिला व विजयानंतर देखील सदिच्छा भेट झाली असता सरकार श्री गणेश कारखान्यासाठी संपर्ण सहकार्यशिल आहे असे नामदार फडणवीस यांनी शब्द दिला आहे.
या गणेश निवडणुकीत ज्यांची चर्चा आजही महाराष्ट्रभर सुरू आहे असे युवानेते विवेक कोल्हे यांनी उपस्थीतांशी संवाद साधताना सर्वांना आगामी काळात आपण गणेश कारखाना पूर्वपदावर आणू त्यासाठी सर्व संचालक मंडळाला तांत्रिक दृष्ट्या अर्ध्या रात्रीही आपले सहकार्य असणार आहे.सभासदांच्या भावनेचा आदर करून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व मी सहकारात राजकारण बाजूला ठेऊन श्री गणेश कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पाऊल टाकले जे अनेक संकटे येऊनही माघारी घेतले नाही. श्री गणेश परिसराने खूप प्रेम आणि विश्वास कोल्हे साहेबांचा नातू म्हणून मला दिला त्यांच्या ऋणात राहून सेवा करत राहील.
चौकट –
दहशतिचे राजकारण झुगारून श्री गणेश सभासद जागृत आहे त्यामुळे आगामी काळात विरोधकांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षाही वेगळा निकाल दिसेल असा टोला विखे यांचे नाव न घेता विश्वास महाले यांनी लगावला.सभासद आणि शेतकरी यांचे हित जोपासून सामंजस्याने काम व्हावे यासाठी कोल्हे कुटुंब काम करते त्यामुळे श्री गणेश कारखाना जोमाने वाटचाल करेल असेही महाले म्हणाले.
या प्रसंगी गंगाधरनाना चौधरी, ‘गणेश’चे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे,सीताराम गाडेकर,धनंजय जाधव,संजय शेळके,चंद्रभान धनवटे,चंद्रभान गुंजाळ,सर्जेराव जाधव,धनंजय धोर्डे,कल्यानराव जगताप,दिलीप रोहोम,बलराज धनवटे,अशोकराव दंडवते,भाऊसाहेब थेटे,सुरेश गमे,संजय सरोदे,रावसाहेब बोठे,डॉ.वसंत लभडे,नानासाहेब शेळके,गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ॲड. नारायणराव कार्ले, डॉ. एकनाथ गोंदकर, नूतन संचालक बाबासाहेब डांगे, संपतराव हिंगे, अनिल टिळेकर, बाळासाहेब चोळके, मधुकर सातव, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, अनिल गाढवे, गंगाधर डांगे, विष्णुपंत शेळके, संपतराव चौधरी, आलेश कापसे, शोभाताई गोंदकर, कमलबाई धनवटे, अरुंधतीताई फोपसे,अरविंद फोपसे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व्हा.चेअरमन रमेश घोडेराव,आजी माजी संचालक पदाधिकारी,टी.डी.बी चे चेअरमन अंबादास देवकर व सर्व संचालक मंडळ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती साहेबराव रोहोम,आदींसह विविध सलग्न संस्थां,भारतीय जनता पार्टी आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.