सातारा/अनिल वीर :सांगली जिल्ह्यातील बेडग, ता. मिरज येथील बौद्ध समाजाला न्याय द्यावा.अन्यथा,आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा रिपाइं(ए)तर्फे देण्यात आला आहे.
बेडग या गावांमध्ये बौद्ध समाजाने त्यांच्या समाजाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती स्वागत कमान उभारली होती. ती स्वागत कमान ग्रामपंचायतमधील लोकांनी ठराव घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेली स्वागत कमान अवैधरित्या पाडली आहे. तेथील आंबेडकरवादी लोकांनी प्रांत कार्यालय तसेच जिल्हाधिकार्यालय या ठिकाणी निवेदन देऊनसुद्धा संबंधित तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतली नाही. तसेच कुठल्याही प्रकारची चौकशीही केली नाही.तेव्हा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करत आहोत.असे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी सांगितले आहे.
बेडग गावच्या बौद्ध समाजाने आपल्याला न्याय मिळत नाही. म्हणून ज्या गावाला बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. ते गाव बौद्ध समाजाला चालत नाही. अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते गाव सोडून निघालेली आहेत. या सर्व गोष्टीचा मुख्यमंत्री व राज्यपाल यांनी गांभीर्यपूर्वक विचार करून संबंधित बौद्ध समाजाला न्याय द्यावा. तसेच ज्यांनी बौद्ध समाजावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्याचा व समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अशावरती कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा,बेडग गावच्या समाजाला न्याय मिळावा. म्हणून आंदोलन छेडण्यात येईल.अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.