मानसी लावर – अग्रवाल यांची राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी. देशभरातील 20,000 हून अधिक महिला स्पर्धकांतून टॉप 50 फायनलिस्टस् मध्ये निवड
कोपरगाव : येथील रहिवासी डॉ. सौ. मानसी लावर – अग्रवाल ह्यांची “मिसेस इंडिया – प्राइड ऑफ नेशन, 2023” या राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत भारतातील 20,000 हून अधिक महिला स्पर्धकांतून टॉप 50 फायनलिस्टस् मध्ये निवड झाली आहे. त्यानंतर राजस्थान मधील जयपूर येथे झालेल्या हॉटेल ताज मध्ये फायनल राऊंड पर्यंत त्या फायनलिस्ट म्हणून पोहचल्या. ह्या स्पर्धेसाठी अनेक नामांकित तारक व तारकांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही केवळ महेनतीच्या जोरावर या स्पर्धसाठी सौंदर्य तसेच टॅलेंट वर प्रचंड मेहनत घेत त्यांनी हे यश संपादन केले. श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक कै. गणेश विश्वनाथ लावर यांची ती नात होय. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तसेच याच क्षेत्रात भविष्यात काम करून ठसा उमटवायची इच्छा तिने या वेळी व्यक्त केली. आपण हे यश पती ॲड. सुमित अग्रवाल यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे मिळवू शकलो अशी देखील भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्ती केली.