पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवण्याचे स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांचे स्वप्न होणार साकार

0

योजना पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केले घोषित

कोपरगाव : माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब व कोपरगाव मतदारसंघाच्या मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे पश्चिम वाहिन्या नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला वळवले जावे यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले त्याचे फलित होऊन ही योजना लवरकच पूर्ण करणार असून जलद गतीने त्याची कार्यवाही सुरू झाली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमात काकडी येथे केली आहे.त्यामुळे शेतकरी आणि नागरिक यांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.

शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील काकडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ना.अजित पवार,ना.दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या वेळी अनेक विकासात्मक योजनांवर मंत्री महोदयांनी आपले विचार व्यक्त केले.निळवंडे जलपूजन कार्यक्रमाची आठवण काढत अनेक पिढ्यांचा पाणी प्रश्न निकाली निघाला असून त्यासाठी भरीव निधी देता आला याचे समाधान असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची घोषणा केली.माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला वळवले तर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे असे स्वप्न पाहिले होते.या साठी उभे आयुष्य त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर हा विषय सर्वांना निदर्शनात आणून दिला.त्या योजनेचा पाठपुरावा मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी सातत्याने केला त्याची दखल उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.आम्ही ही योजना पूर्ण ताकतीने पूर्ण करणार असून मराठवाडा विरुद्ध नगर नाशिक हा पाणी संघर्ष मिटवण्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची ठरणार आहे त्यामुळे योजनेला गती दिली आहे असे फडणवीस या वेळी म्हणाले.

या कार्यक्रमात मंचावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.,खा.सदाशिव लोखंडे,खा.सुजय विखे, मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे,कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे, नगर जिल्ह्यातील आजी माजी आमदार,विविध संस्थांचे पदाधिकारी,सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि योजनांचे लाभार्थी आणि बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना जलद गतीने पूर्ण करणार अशी घोषणा केली व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुन्हा उजाळा दिल्या त्यावेळी अनेक वर्षांपासून असलेल्या माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे आणि सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या सततच्या मागणीला यश आल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here