कोपरगाव : त्याग आणि बलिदान कधीही विसरले जात नाही . काँग्रेस आणि नेहरू कुटुंबाने देशासाठी केलेले बलिदान आणि त्याग कायम स्मरणात राहील . केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी कितीही इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला तरी ते यात यशस्वी होऊ शकत नाही असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार राजेंद्र वाघमारे यांनी केले. ते आज कोपरगाव येथे बोलत होते . वाघमारे हे अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत तर माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय राहिले आहे. त्यामुळे ते शिर्डी लोकसभा मतसंघासाठी काँग्रेस कडून प्रबळ दावेदार मानले जात आहे. वाघमारे यांनी शिर्डी लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीबाबत पक्षातील कार्यकर्ते आणि पत्रकारांची सदिच्छा भेट घेतली . त्याप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील कार्य बहुमोलाचे आहे. आणि त्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखू शकलो आहोत . आणि स्वातंत्र्यानंतरही इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना देशासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. असा वारसा लाभलेल्या काँग्रेस पक्षाचा आणि गांधी नेहरू घराण्याचा इतिहास बदलण्याचे पाप सध्याचे केंद्रातील सत्ताधारी करीत आहे. त्याचसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली देशाची महान राज्यघटना बदलाच्या प्रयत्नात सत्ताधारी आहेत. आपल्या देश आणि संविधान वाचवायचे असल्यास काँग्रेस शिवाय दुसरा पर्याय नाही. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्राचे सरचिटणीस नितीन शिंदे, बंटी यादव प्रदेश सचिव महराष्ट्र अनु. जा. ,विजय जाधव किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष , संभाजी माळवदे नेवासा काँग्रेस तालुकाध्यक्ष, चंद्रकांत बागुल तालुकाध्यक्ष कोपरगाव अनु.जा., आदी उपस्थित होते.
राजेंद्र वाघमारे ठरणार शिर्डीसाठी योग्य आणि प्रबळ दावेदार ! वाघमारे म्हणाले की राज्यातील महाआघाडीच्या राजकारणात काही तडजोडी स्वीकाराव्या लागतात .मात्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यामध्ये अधिकाधिक लोकसभेच्या जागा निवडून आणण्याचे नियोजन केले आहे. शिर्डी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र मागील तीन निवडणुकांमध्ये तो विरोधकांच्या हातात गेला आहे. अनुसूचित जातीजमातीसाठी हा मतदारसंघ राखीव होऊनही मागील दोन्ही खासदार शिर्डी मतदारसंघाचा विकास करू शकले नाही. ते ज्या अनुसूचित जातीतून आले आहे त्या समुदायालाही ते न्याय देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे दलबदलूं आणि निवडून गेल्यानंतर मतदारसंघाकडे पुन्हा कधीही न फिरकणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधींवर जनता प्रचंड नाराज आहे. आपला नेवास्यापासून ते कोपरगाव -अकोल्यापर्यंत जनसंपर्क आहे . आपल्याला वरिष्ठांनी संधी दिल्यास हा मतदारसंघ आपण पुन्हा एकदा काँग्रेसमय करून दाखवू असा विश्वास वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला .