होलार समाजाचे महाअधिवेशन घेण्यात येणार : ना. रामदास आठवले

0

सातारा/अनिल वीर : अखिल भारतीय होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य सहसचिव समाजरत्न दिवंगत राजाभाऊ विठ्ठल माने यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेटीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट दिली.

             यावेळी अखिल भारतीय होलार समाज संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नंदकुमार केंगार, जिल्हाध्यक्ष लालासो. शिवाजी आवटे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश मोहन नामदास, जिल्हा प्रमुख मार्गदर्शक दिलीप चौगुले, जिल्हा खजिनदार दत्ताभाऊ आवटे, शहर संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ अहिवळे, शहर सचिव मंथन करवले, शहर खजिनदार युवराज करवले,गणेश अहिवळे, जेष्ठ कार्यकर्ते हानुमंत खांडेकर, हानूमंत तोरणे,डायमंड माने, अर्जुन चौगुले, कु.वैष्णव नामदास, संघटनेचे कार्यकर्ते,आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड,त्यांचे सहकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर समाज बांधव उपस्थित होते.यावेळी ना.रामदास आठवले यांनी होलार समाजातील विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी महाआधिवेशन घेण्यात येणार असल्याचे सांगितले. स्व.कै. राजाभाऊ विठ्ठल माने यांनी मतकर काॅलनी मोळाचा ओढा येथे उभारण्यात आलेल्या आरपीआय पक्ष संघटनेच्या वास्तुच्या नुतनीकरणासाठी रु.५  लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.लवकरच स्व.कै.राजाभाऊ विठ्ठल माने यांचे चिरंजीव रवी माने यांची महाराष्ट्र राज्य पातळीवर संघटनेवर निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here