आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, बुधवार, दि. ३० ऑगस्ट २०२३, निज श्रावण शुक्ल पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, चंद्र – मकर राशीत सकाळी १० वा. ४० मि. पर्यंत नंतर कुंभ राशीत, नक्षत्र- उत्तराषाढा, सुर्योदय- सकाळी ६ वा. २४ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५६ मि.
नमस्कार आज चंद्र मकर राशीत सकाळी १० वा. ४० मि. पर्यंत रहात असून नंतर तो कुंभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस सकाळी ११ पर्यंत चांगला दिवस आहे. आज शनि – चंद्र युतीयोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र स्वरुपाचा जाईल.

दैनंदिन राशिभविष्य
मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. संततिसौख्य लाभेल. आनंदी व आशावादी रहाल. दुपारनंतर विविध लाभ होतील.
वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हितशत्रुंवर मात कराल. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल.
मिथुन : व्यवसायातील आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. मानसिक प्रसन्नता लाभेल. दुपारनंतर विशेष उत्साही रहाल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल कमी राहील.आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक त्रास संभवतो. प्रवास टाळावेत.
सिंह : वादविवाद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक स्वास्थ्य जपावे. प्रवासात काळजी हवी. मनोबल कमी राहील.
: नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. कामे मार्गी लागतील. दुपारनंतर काहींना अनावश्यक खर्च संभवतात.
तुळ : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दुपारनंतर आनंदी व आशावादी रहाल. स्वास्थ्य लाभेल.
वृश्चिक : गुरूकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक ताकद वाढेल. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जिद्दीने कार्यरत रहाणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
मकर : नाोकरीत समाधानकारक स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर आर्थिक कामात स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल. मानसिक परिवर्तन होईल.
मीन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्वाची कामे टाळावीत.
आज बुधवार, आज दुपारी १२ ते १.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४