मुख्यमंत्री, कृषिमंत्री,आमदार ,खासदाराना शेतकऱ्याच्या यातना दिसेना
सुदाम गाडेकर जालना :
पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यात उभी पीक करपून गेली आहे. चाळीस दिवसापासून पाऊस पडला नाही.तलाव ,विहिरींना पाणी नाही.आणि दिवसंदिवस उन्हाचा तडाखा वाढतच आहे. उन्ह्यामुळे सोयाबीन ,मका,मूग,कापूस,सर्वच पिके शेवटची घटिका मोजत आहे. डोळ्यादेखत पीक वाळत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे .
मराठवाड्यात दुष्काळाचं भयाण वास्तव आहे . जनावरांना चारा,पाणी नाही .जनावरे सभाळायची कशी असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतात जिकडे तिकडे उन्हाने करपून गेलेली पीक दिसत आहे . मात्र मुख्यमंत्री,कृषी मंत्री ,आमदार खासदार यांना बळीराज्याच्या यातना दिसत नाही का? मतदानासाठी शेतकऱ्यांनच्या दारात फिरता बळीराजा संकटात सापडला आहे आता बळीराज्याच्या समस्या सोडवण्यासाठी मतदार संघात आमदार ,खासदार ,मंत्री फिरकेना हे भयाण वास्तव मराठवाड्यातील आहे . एकीकडे सरकार सांगत आहे आम्ही बळीराज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मग मराठवाडयातील शेतकर्यांना दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार रुपये मदत करणार का? नुसत्या भूल थापा मारून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणार ?
शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर आहे तर शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांच्या नोटिसा पाठवल्या जात आहे . पाऊस सुरू होऊन अडीच महिन्यांपेक्षा अधिकचा काळ संपत आला आहे, मात्र राज्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. पीक पावसा अभावी डोळ्या देखत करपून जात आहे . शेतात खूप मोठा खर्च केला गेला शेतात खर्च केलेला पैसा यावर्षी निघू शकत नाही कारण पीक करपून गेलं आहे.बँकांचे कर्ज भरायचे कसे ? तर मायबाप साकारला जाग येऊन बळीराजाच्या यातना दिसतील असा प्रश्न शेतकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे.तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार का?