जाणतात सानथोर
उत्सवांचे प्रयोजन
उत्साहाने सळसळे
करे सार्थ आयोजन…
सांगता सोहळ्याची
करायचे परिमार्जन
कच-यास विल्हेवाट
अपूर्ण ते संमार्जन…
भग्न मूर्ती अवशेष
वेचून करे विसर्जन
रोग नको वृध्दींगत
निर्माल्याचे संकलन…
स्वच्छता महत्त्वाची
मुलांनाही आकलन
पुढाकार वृध्दही घेई
करती सार्थ संचलन…
शुभकार्यां साथ देती
एक होई सकलजन
निमित्ते होई प्रबोधन
उत्साही ऑक्सिजन…
जागरूकता आलेली
सर्वत्र दिसे परिवर्तन
उत्सव सर्वधर्मियांचा
मनात शुध्द आवर्तन …..
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996..