एस. एम. जोशी महाविद्यालय हडपसरच्या प्राचार्यपदी डॉ.किशोर काकडे

0

हडपसर/ पुणे , प्रतिनिधी :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजच्या S. M. Joshi College Hadapsar प्रभारी प्राचार्यपदी डॉ.किशोर पंढरीनाथ काकडे Dr. Kishore Kakade यांची नियुक्ती करण्यात आली आह़े. त्यांच्या या नियुक्तीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतन (दादा) तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अमर तुपे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

डॉ.किशोर काकडे Dr. Kishore Kakade यांनी M.Sc.(इलेक्ट्रॉनिक्स), Ph.D.  (भौतिकशास्त्र), SET., NET (इलेक्ट्रॉनिक्स) या विषयामधून शिक्षण घेतले असून, ते इलेक्ट्रॉनिक्स सायन्सचे प्राध्यापक आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात ते तीस वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य म्हणून ASC कॉलेज, मोखाडा जि. पालघर (2012-2015), SSGM कॉलेज, कोपरगाव (2015-2017), SSGM कॉलेज, कोपरगाव (2017- 2018) येथे उत्कृष्ट प्रशासकीय कार्य केले आह़े. त्यांचे 30 रिसर्च पेपर पीअर-रिव्ह्यूड इंटरनॅशनल जर्नल्स मधून प्रकाशित झाले आहेत. तसेच नॅशनल व इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांनी 37 रिसर्च पेपर सादर केले आहेत. त्यांना राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून 22 वेळा निमंत्रित केले आह़े. त्यांनी पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठामधून 3 रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. 

मोखाडा (आदिवासी व डोंगराळ भाग) येथे प्राचार्य म्हणून जि.पालघर, काम करताना कॉलेजचे पहिले NAAC करून  महाविद्यालयास बी ग्रेड मिळवून दिला. तसेच महाविद्यालयात B.Sc ची शाखा सुरू करून भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र, एम.ए. (इतिहास) इतर विषय सुरु केले. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले.  आदिवासी निवासी शाळा “संस्थेच्या आश्रमशाळा प्रकल्पासाठी “प्रकल्प अधिकारी” म्हणूनही त्यांनी काम केले आह़े. SSGM कॉलेजमध्ये प्राचार्य असताना महाविद्यालयास B++ ग्रेडसह, NAAC ने पायाभूत सुविधांचे नूतनीकरण केले. UGC, DST आणि इतर एजन्सींकडून 2 कोटींहून अधिक अनुदान मिळविले.   विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव वाढविणे, शैक्षणिक निकाल, संशोधन, पायाभूत सुविधा आणि शिस्त यामध्ये आमूलाग्र बदल केले. संस्थेच्या प्रकल्पासाठी समन्वयक म्हणूनही काम केले. एस. एम. जोशी महाविद्यालय हडपसर येथे स्पर्धा परीक्षेसाठी मुलींना प्रशिक्षण दिले. NAAC च्या तिसऱ्या सायकलमध्ये महाविद्यालयास A ग्रेड मिळवून दिला. 

महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावरील विविध समित्यांवर त्यांनी उत्कृष्ट काम केले आह़े. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आह़े. ‘UGC शिक्षक फेलोशिप पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय शिक्षक “महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार’, आंतरराष्ट्रीय परिषद बँकॉक, थायलंड येथे सर्वोत्कृष्ट सत्र पेपर पुरस्कार इतर पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आह़े. त्यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, आय.क्यू.ए.सी. सह-समन्वयक डॉ.शहाजी करांडे, कार्यालयीन अधिक्षक शेखर परदेशी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन सेवक आणि विद्यार्थी इत्यादींनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here