सातारा : भारतीय संविधान हे भारतीयांनी स्वतःप्रत अर्पण केले असल्याने एकप्रकारे स्व-प्रगतीचा वचननामाच आहे.असे मार्मिक प्रतिपादन राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ यांनी केले.
येथील पुर्वा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त,”भारताचे आदर्श संविधान” या विषयावर मार्गदर्शन करताना ऍड.धुमाळ बोलत होते.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. विठ्ठलराव जाधव यांनी प्रास्ताविक केले.जेष्ठ नागरिक प्रा. कुमार मंडपे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करून ऍड.धुमाळ यांचा परिचय करून दिला. संस्थेचा कार्यपरिचय व सूत्रसंचालन डॉ. वैशाली भोसेकर यांनी केले. प्रा. बानूबी बागवान यांनी स्वागत केले. तसेच पाहुण्यांच्या व अध्यक्ष यांच्या हस्ते डिसेंबर सन-२०२३ मध्ये जन्म वर्धापन दिन असलेल्या सभासदांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ऍड. धुमाळ यांनी,” भिमरायाचे बोले संविधान व संविधानानी जीवन नटविलं… व ठेवलीच नाही कमी…..” अशी संविधानसंबंधी गीते गाऊन श्रोतृवर्गास मंत्रमुग्ध व अंतर्मुख केले.सदरच्या कार्यक्रमास पुर्वा जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यासह डॉ. विजय उनउने, सौ. शैलजा क्षीरसागर, प्रभाकर जोशी, राजाराम जाधव, दशरथ रणदिवे, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर व सदरबझारमधील जाणकार, डॉक्टर्स, इंजीनिअर्स, प्राध्यापक, शिक्षक, व्यवसायीक बंधु – भगिनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. प्रा. प्रमोदिनी मंडपे यांनी आभारप्रदर्शन केले.