येवल्यात शुक्रवारी पाच जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे उद्बोधन शिबिर!

0

नाशिक येथे पुर्वतयारी सभा,मुख्याध्यापक- शिक्षक संघटनांनी सहभागी होण्याचे आमदार दराडेचे आवाहन

येवला, प्रतिनिधी :

 नियोजित शैक्षणिक धोरणातील बदल तसेच मुख्याध्यापकाचे कामकाज याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी (ता.२२) धुळे,जळगाव,नंदुरबार,नाशिक व नगर या पाच जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे उद्बोधन कार्यशाळा बाभुळगाव (येवला) येथील एसएनडी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.राज्याचे शिक्षण आयुक्तांसह संचालक व अधिकारी उपस्थित राहणार असल्याने सर्व मुख्याध्यापकांसह शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून शैक्षणिक बदलांच्या महत्त्वपूर्ण माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी केले.

या कार्यशाळेच्या नियोजनासाठी जिल्हा मुख्याध्यापक संघ व विविध संघटनाच्या प्रतिनिधी समवेत सहविचार पूर्वतयारी सभा नासिक येथे भारत स्काऊट गाईडच्या सभागृहत पार पडली.यावेळी आमदार दराडे यांनी हे आवाहन केले.

विभागातील मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक यांची एकत्रित कार्यशाळा जगदंबा एज्युकेशन सोसायटी बाभूळगाव येथे आयोजित करण्यात आलेली असून या कार्यशाळेसाठी राज्याचे शिक्षण सचिव,राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी,प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक श्री.गोसावी, नासिक विभागाचे उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण,पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे व पाचही जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी आगामी शैक्षणिक धोरणांसह मुख्याध्यापकांच्या कामकाजातील विविध बदलांची माहिती दिली जाणार आहे.

सायबर वेलनेस या विषयावर तन्मय जोशी यांचेही व्याख्यान असणार आहे.या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन व नियोजनासाठी पुर्वतयारी सभा नुकतीच पार पडली.यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.अनेक संघटनाचे प्रतिनिधीनी भाग घेतला.

जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी. देशमुख यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजनाची माहिती दिली. उत्तर महाराष्ट्रातील हे प्रथमच मोठे उद्बोधन शिबिर होत असून या शिबिरासाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी उपस्थित राहुन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. दराडे,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे श्री.देशमुख यांनी केले.शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, अडीअडचणी,आव्हाने तसेच नवीन शैक्षणिक धोरण, सायबर सिक्युरिटी बाबत विद्यार्थ्यांनी घ्यावयाची दक्षता,मुख्याध्यापकांचे हक्क व जबाबदाऱ्या या महत्त्वपूर्ण विषयांवर व्याख्यान आयोजित केलेली आहे.प्रसिद्ध प्रकाशकांचे पुस्तक स्टॉल्स लावले जाणार आहे.सर्वांनी या व्याख्याने व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख,उपाध्यक्ष प्रदीप सांगळे,बी.के.शेवाळे,डॉ.अनिल माळी,बी.के.नागरे, डी.एस.ठाकरे,सुरेश घरटे,भागिनाथ घोटेकर,आर.टी.जाधव,

सखाराम जाधव,शिक्षकेतर संघटनेचे नेते सोमनाथ धात्रक,गोरख येवले,बाळासाहेब गांगुर्डे,श्री.गायकवाड,सुलेखा पाटील,दत्तात्रय सांगळे,एम.डी.काळे,बी.के.अहिरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here