आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, मार्गशीर्ष पौर्णिमा, श्री दत्त जयंती, मंगळवार , दि. २६ डिसेंबर २०२३, चंद्र – वृषभ राशीत सकाळी ९ वा. ५७ मि. पर्यंत नंतर मिथुन राशीत, नक्षत्र – मृग, सुर्योदय- सकाळी ०७ वा. १० मि. , सुर्यास्त- सायं. ६ वा. ०८ मि.
नमस्कार आज चंद्र वृषभ राशीत सकाळी ९ वा. ०७ मि. पर्यंत रहात असून नंतर तो मिथुन राशीत रहाणार आहे. आज रवि -चंद्र प्रतियोग, चंद्र – मंगळ प्रतियोग, चंद्र – बुध प्रतियोग व चन्द्र – शनि त्रिकोणयोग होत आहे.
दैनंदिन राशिभविष्य Daily Horoscope
मेष : आपले आरोग्य उत्तम असणार आहे. महत्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपार पुर्वी करावीत. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो.
वृषभ : काहींना दुपारनंतर अनपेक्षित धनलाभ संभवतो. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असल्याने कामे यशस्वी होणार आहेत.
मिथुन : दुपारनंतर आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत.
कर्क : मानसिकता सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला एखादा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत.
सिंह : दुपारनंतर अनपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रियजनांशी झालेला सुसंवाद एखादा सुखद अनुभव देईल. काहींना विविध लाभ होणार आहेत.
कन्या : नोकरी व व्यवसायातील महत्वाची कामे दुपारनंतर मार्गी लावता येणार आहेत. कामाचा ताण जाणवणार आहे.
तुळ : दुपारनंतर आपणाला काही सुखकारक अनुभव येतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहींना दुपारनंतर अनपेक्षित प्रवास संभवतो.
वृश्चिक : दैनंदिन कामात दुपारनंतर अडचणी जाणवतील. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी.
धनु : कामाचा ताण जाणवणार आहे. दुपारनंतर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. कामाचा उरक वाढेल.
मकर : दुपारनंतर दैनंदिन कामाचा ताण जाणवणार आहे. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी.
कुंभ : दुपारनंतर उत्साह व उमेद वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहे. नोकरी, व्यवसायात कामे पूर्ण होणार आहेत.
मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होणारेत. मानसिक त्रास कमी होईल. आनंदी वातावरण रहाणार आहे. काहींना एखादी भाग्यकारक अनुभव येणार आहेत.
आज मंगळवार, आज दुपारी ३ ते ४.३० या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४