ऐन उन्हाळ्यात कामगारांच्या कुटुंबीयांवर ‘ कोणी पाणी देत का पाणी’ म्हणण्याची वेळ
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखान्याने देवळाली प्रवरा नगरपरिषदेची ७० लाख ९ हजार ३३० रुपये पाणीपट्टी थकविल्याने कारखाना कामगार वसाहतीचा पाणीपुरवठा नगर पालिकेने खंडित केला आहे.ऐन उन्हाळ्यात तनपुरे कारखाना कामगार कुटुंबियांना पाण्यासाठी वणवण करावे लागत असल्याने कामगार कुटूंबियांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेने तनपुरे कारखाना प्रशासकीय मंडळ यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे तनपुरे कारखाना कामगार वसाहतीचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. तनपुरे कारखाना कामगार कुटुंबीयांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हांडे, ड्रम घेऊन महिला व त्यांच्या घरातील सदस्यांना ‘ कोणी पाणी देत का पाणी’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
कामगार वसाहतीत हजारो लोक वास्तव्यास आहे. नगरपालिका व कारखाना प्रशासकीय अधिकारी यांनी लवकरात लवकर पाणी पुरावठा सुरू करुन गरीब लोकांच्या हाल होणार नाही व उष्मा घाताने एकदा बळी जाणार नाही याची नोंद घ्यावी अशी मागणी कामगार कुटूंबाने करून कारखाना प्रशासन कडे फंड नसेल तर, कामगार वसाहतीमधे कामगार नवीन पाणी पूरवठा जोडणी स्व- खर्चने घेण्यात तयार आहे. कारखान्यावर नवीन संचालक मंडळ येई पर्यंत, नगरपालिका अधीकारी व कारखाना प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने निर्णय घ्यावा.
प्रशासकीय मंडळ व नगर पालिका अधिकारी यांच्यात चर्चा होऊन निर्णय होई पर्यंत प्रत्यक कॉलनीत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा २ एप्रिल २०२४ पर्यंत सदर प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे