शिक्षणाच होणार धार्मिकीकरण, बाजारीकरण व बेरोजगारीकरण हाणून पाडा : अध्यापकभारती

0

सामाजिक विषमता, देशाच्या अखंडतेसाठी ऑनलाईन अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन 

येवला (प्रतिनिधी)

    इयत्ता ३ री ते १२ वी इयत्तांचा पाठ्यक्रम मसुद्याबाबत जनतेस आपले अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इयत्ता ३ री ते १२ वी इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक,राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. सदर मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक २३ मे २०२४ पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.    देशाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात 

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षणाचे धार्मिकीकरण, बाजारीकरण व बेरोजगारीकरण करण्याचा डाव आखला गेला असून भारतीय संविधानिक मूल्यांना डावलून वर्ग व वर्ण व्यवस्था पुन्हा शैक्षणिक धोरणातून आणली जात असून धर्मांध व संविधानिक मूल्यविरोधी राज्यकर्त्यांचा कुटील डाव हाणून पाडा असे आवाहन भारतातील तमाम जनतेस  अध्यापकभारतीच्या वतीने करण्यात येत आहे.

    महाराष्ट्र राज्यातील अधिकाधिक नागरिकांनी याबाबत आपले अभिप्राय नोंदवावेत असे आवाहन तमाम संविधानवादी, मानवतावादी नागरिकांनी केले आहे.                  राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक ३ जुन २०२४ पर्यंत सोबतच्या लिंक वर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन राष्ट्रीय बालक विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापक भारतीय यांच्या वतीने करण्यात येत आहे.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here