चिरनेर येथे यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येचा निषेध.

0

शहरासह ग्रामीण परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला तीव्र संताप 

उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे ) : उरण शहरातील एन आय हायस्कूल येथील रहिवासी असलेली तरुणी यशश्री शिंदे (२०)या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली.माणुसकीला काळिमा फासणारी ही दुर्दैवी घटना असून या घटनेचा उरण तालुक्यासह,पनवेल,नवीमुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला असून कोप्रोली नाक्यावरील बाजारपेठ बंद ठेऊन दहागावच्या नागरिकांनी कोप्रोली नाक्यावर मोर्चा काढला होता.त्याचे पडसाद जंगल सत्याग्रहींच्या चिरनेर भूमीसह ग्रामीण परिसरात सर्वत्र या घटनेचे प्रतिसाद उमटले आहेत.

चिरनेर ग्रामपंचायतीने स्पीकर द्वारे  २९ जुलै रोजी दुपारी चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व बाजारपेठ  ३० जुलै रोजी  बंद ठेवण्याच्या ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याचे काटेखोरपणे पालन करीत चिरनेर गावातील व हायवे वरील बाजारपेठ बंद ठेवण्यात येऊन संपूर्ण चिरनेर परिसरात यशश्री शिंदे हिच्या स्मुतीस श्रद्धांजली अर्पण करीत तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम दाऊद शेख या आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली असून,परिसरात या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

चिरनेर ग्रामपंचायतीच्या वतीने काढण्यात असलेल्या निषेध मोर्चात  सरपंच भास्कर मोकल,शिवसेना तालूका प्रमुख संतोष ठाकूर, माजी उपसभापती शुभांगी पाटील,उपसरपंच सचिन घबाडी,सामाजिक कार्यकर्त्या जयवंती गोंधळी, माजी सरपंच ज्योती म्हात्रे, अलंकार परदेशी,ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल खारपाटील,वनिता गोंधळी,पद्माकर फोफेरकर,बापू मोकल,घनश्याम पाटील,चंद्रकांत गोंधळी, पोलिस पाटील संजय पाटील,जयवंत पाटील व दत्तात्रेय म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here