लोटस हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान व बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत शिबीराचे आयोजन ..

नांदेड, ता.१६

शहरातील लोटस हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत  लहान मुलांच्या हृदयरोगाचे निदान व उपचार शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट रोजी शिबिर घेण्यात आले या शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे . या शिबिराचे नियोजन नांदेड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन जिल्हा शल्य चिकित्सर डॉ. निळकंठ भोसीकर आणि आर.बी.एस.के चे जिल्हा नियोजन अधिकारी डॉ.अनिल  कांबळे व टीम आणि लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉ.संजय पडलवर  यांच्यामुळे शक्य झाले.

हृदयरोग ग्रस्त सर्व मुलांवर राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत विविध शासकीय आरोग्य योजनाच्या अंतर्गत उपचार करण्यात येतात तसेच लहान मुलांच्या हृदयरोगाचे निदान व उपचार शिबिर लोटस हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन वर्षापासून सातत्याने दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी घेण्यात येते या शिबीरात ह्दयरोग निदानाबरोबरच ९० लहान मुलांची टू-डी ईको तपासणी करण्यात आली यामधून 21 मुलांच्या हृदयाला छिद्रा आढळून आले त्यातील आठ (8) मुलांच्या हृदयाची बिन टाक्याच्या ऑपरेशन द्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर तेरा (13) बालकांना 20 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजे पुढील महिन्यात उपचारासाठी बोलविण्यात आलेले आहे तसेच 10 गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना मुंबई येथील अद्यावत अशा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे अशी माहिती लोटसच्या वतीने यावेळी देण्यात आली एकंदरीत या लहान मुलांच्या हृदयरोग तपासणी शिबिरात जवळपास 31 लहान मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे

या वेळी  लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय पडलवार यांनी या शिबिराचा नांदेडसह मराठवाड्यातील जनतेला लाभ मिळावा, यासाठी हा उपक्रम दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी आयोजित केलेल्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लहान मुलांच्या ह्दयरोग शिबीर आयोजना बद्दल सन्मान..

गोर-गरीब मुलांसाठीच्या लहान मुलांचे हृदयरोग तपासणी शिबिराच्या सातत्यपूर्ण आयोजनाबद्दल लोटस् हॉस्पिटलचे संचालक डॉ संजय पडलवार यांचा सत्कार लोटस् हॉस्पिटलच्या टिमच्या वतीने करण्यात आला. अधिक माहितीसाठी संपर्क व्यवस्थापक लोटस हॉस्पिटल नांदेड श्री.शाहिद एस चांद मो.न.7057981987

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here