शर्मिला महेंद्र गावंड यांच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड.

0

स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याकडून सन्मान.

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) : स्टेट इनोवेशन रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय स्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेत रायगड जिल्हा परिषद शाळा नवीन शेवे येथील उपक्रमशील शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंड यांच्या व्हिडिओ द्वारे अध्ययन अध्यापन या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून सिंहगड इन्स्टिटयूट सोलापूर येथे उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते शर्मिला गावंड यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य सारथी शिष्यवृत्तीचे प्रमुख  अशोक काकडे यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध साहित्यिक संजय जगताप ,सकाळचे संपादक अभय दिवाणजी ,योगेश सोनवणे, बालभारतीचे सदस्य अजय कुमार लोळगे, लातूरचे कलेक्टर वर्षा ठाकूर, सर फाउंडेशनचे  आयोजक बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशाळे,  राजकिरण चव्हाण,  हेमा वाघ,अनघा जहागीरदार आदींच्या उपस्थितीत या नव उपक्रमाची  सर फाउंडेशन कडून राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात.विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच संकल्पनांचा वापर करीत असतात, प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करत असतात त्यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्व शहरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा स्टेट इनोवेशन रिसर्च फाउंडेशन यांच्यामार्फत आयोजित केले जातात .

यावर्षीच्या नवोपक्रम स्पर्धा मधील निकाल नुकताच जाहीर करण्यात आला या स्पर्धेमध्ये उरण तालुक्यातील नवीन शेवे शाळेवर कार्यरत असलेल्या उपक्रमशील शिक्षिका की ज्यांनी यापूर्वी द्रोणागिरी भूषण पुरस्कार, तसेच पाच राज्यांचा गोवा या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार घेण्याचा मान पटकावला होता , राज्यस्तरीय नारी सन्मार्ग पुरस्कार यांनी शर्मिला गावंड यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केले होते .आज या ठिकाणी त्यांच्या उपक्रमाची निवड राष्ट्रीय स्तरावर करण्यात आली असून सर्व विभागातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here