जामखेड तालुका प्रतिनिधी
महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समितीची नुकतीच बैठक संपन्न झाली असुन यामध्ये जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विमुक्त भटक्या जमाती विभाग प्रमुख पांडुरंग माने यांची समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र समितीचे अध्यक्ष. युवराज श्रीमंत महाराज भुषणसिह राजे होळकर यांच्या आदेशानुसार देण्यात आले आहे
दि. ६ जानेवारी रोजी वाफगाव राजगुरुनगर (खेड) पुणे येथे राज्याभिषेक सोहळा होणार आहे. पांडुरंग माने यांची समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.