सातारा : दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापमानात घट होत आहे. काही भागात पारा १० अंशापर्यंत खाली आहे. पुण्यासह, सातारा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तापमानात कमालीची घट झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे पुढचे काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे. शुक्रवारी धुळ्यात राज्यातील नीचांकी ७ अंश तापमानाची नोंद झाली. तसेच निफाड, परभणी आणि गोंदिया येथे किमान तापमान १० अंशांनी खाली आले. विदर्भात पुढच्या काही दिवसांत तापमानात फारसा फरक होणार नसल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
साताऱ्यातही थंडी वाढली आहे. येथील किमान तापमानात १ अंशांची घट झाली आहे. तर सांगलीत वातावरण ढगाळ राहणार असून किमान तापमान १५ अंश सेल्सीअस नोंदवण्यात आले. याशिवाय कोल्हापूरमध्येही थंडी वाढली आहे. जिह्यात किमान तापमान १४ अंशांपर्यंत खाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे चारही उपविभागामध्ये पुढचे चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.
राज्यात आज विविध ठिकाणी नोंदले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे – ११.७
अहिल्यानगर -१०.४
धुळे- ७
जळगाव-१०.४
जेऊर- ११.५
कोल्हापूर- १६.५
महाबळेश्वर- १२.८
नाशिक- ११.३
निफाड- ८.२
सांगली- १५.९
सातारा- १४.६
सोलापूर- १४.६
सांताक्रूझ- १६.७
डहाणू- १७.६
रत्नागिरी- १९
छत्रपती संभाजीनगर- १२.६
धाराशिव- १३
परभणी- १२.१
परभणी – ७.४
अकोला- १२.६
अमरावती- ११.१
भंडारा- ११.०
बुलडाणा- १३.५
ब्रह्मपुरी- ११.९
गडचिरोली- ११