संच मान्यता दुरूस्तीचे अधिकार विभागीय शिक्षण उप-संचालकांना देण्याची मागणी

0

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी

नाशिक प्रतिनिधी : संच मान्यता दुरूस्तीचे अधिकार विभागीय शिक्षण  उप -संचालकांना द्या अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह यांना निवेदन देऊन केली आहे . या निवेदांत म्हटले आहे की संच मान्यता दुरूस्ती साठी शाळांना थेट संचालक कार्यालय पुणे येथे जावे लागते. अनेक चकरा मारूनही संच मान्यता दुरूस्ती होत नाही. संच मान्यता दुरूस्ती न झाल्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे . गेल्या दोन वर्षापासुन अनेक शाळांचे अनेक मुख्याध्यापक त्रस्त असल्याची तक्रार या नेवेदानात केली आहे.

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी . देशमुख,उपाध्यक्ष – प्रदिप सांगळे , डॉ अनिल माळी, बी . के . नागरे, ए .के . खालकर, एम . डी . काळे, प्रकाश देशमुख, बजरंग चोले यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय मुंबई येथे शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले . या बरोबरच सेमी इंग्रजी तुकड्यांची मान्यता शिक्षणाधिकारी स्तरावरच मिळावी . माध्यमिक शिक्षकांना शाळा बाह्य कामे देवू नये . वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी साठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे . शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत फरक बिले, वैद्यकीय बिले त्वरित काढावीत .

संस्था वादामुळे सेवा निवृत्ती मुख्याध्यापक / शिक्षक यांच्या प्रस्तावावर सह्या करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना शासनाने देवुन ही ते अधिकार वापरत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी . दर तीन महिन्याला मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यां सोबत शिक्षण उपसंचालकांनी विभाग निहाय आढावा बैठक घ्यावी . दप्तर दिरंगाई होणार नाही याच्या सुचना शिक्षणाधिकाऱ्यांना दयाव्या . आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here