देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
नगर मनमाड महामार्गाच्या कडेने पायी घरी जाणाऱ्या तांभेर येथील जीवन वामन वाघ (वय ५५) यांना पाठीमागुन अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. हा अपघात गुहा शिवारातील सेल पेट्रोल पंपाजवळ घडली.
याबाबत समजलेली माहिती अशीकी सोमवारी राञी ९ ते १० च्या दरम्यान जीवन वामन वाघ हा राहुरी फँक्टरी येथुन तांभेरे येथिल घरी पायी जात असताना गुहा गावाजवळील सेल पेट्रोल पंपा समारे अज्ञात वाहनाने पाठीमागुन जोराची धडक दिली.अपघाता समयी स्थानिक नागरिकांनी मदत करुन रविंद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहीकाला पाचारण करुन राहुरी येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापुर्वी निधन झाल्याचे वैद्यकीय सुञांनी सांगितले.
राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहना विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहे.