निर्णय लवकर घेतल्यास अधिवेशनात लक्ष वेधणार-आ.हेमंत ओगले
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरीच्या विवेकानंद नर्सिंग होमच्या कामगारांवर जो अन्याय होत आहे, तो कदापिही सहन केला जाणार नाही, गेल्या ५ दिवसांपासून कर्मचारी धरणे आंदोलन करत आहे, याप्रश्नी प्रशासकाने गुरुवार पर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास याबाबत अधिवेशनात लक्ष वेधनार असल्याचा इशारा आ.हेमंत ओगले यांनी दिला आहे.
विवेकानंद नर्सिंग होममधील मर्जीतील कामगारांना बेकायदेशीर नेमणूका करून पदोन्नती व पगार वाढ केली. यामुळे अनेक वर्षापासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याने नर्सिंग होम, फार्मसी कॉलेज व नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ३ मार्च पासून धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक कर्मचाऱ्यांची आज शनिवारी सायंकाळी आ.हेमंत ओगले यांनी भेट घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा मुसमाडे, भाऊसाहेब गुंजाळ, भास्कर कोळसे, प्राचार्य अनंतकुमार शेकोकार, प्राचार्य बाळासाहेब शिरस्कर आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.