कोपरगाव –
तालुक्यातील तिळवणी येथील सद्गुरू संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान सोहळा संपन्न झाला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती जयश्री बागुल या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पंडोरे हे होते. स्वागत व प्रास्ताविक वाचनालयाचे विष्णू वाघ यांनी केले.
प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक लक्ष्मण पंडोरे यांनी महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले. समारंभासाठी सी आर पी सविता शिंदे, अंगणवाडी सेविका आशा वाघ, शशीकला शिंदे, माधुरी शिंदे, ताराबाई शिंदे, सुनिता जगताप, रत्ना पगारे, अश्विनी शेळके आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी परिसरातील महिलांसाठी मोफत ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले. ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत ग्रंथ उपलब्ध होणार असल्याने आनंदी वातावरण निर्माण झाले.