पंढरपुरात स्वच्छतेचं काम करणारी महिलेला लागली २१ लाखाची लॉटरी

0

पंढरपूर : पिढ्यानपिढ्या करत आलेले स्वच्छतेच काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी महिला रातोरात लखपती झाली आहे. पंढरपुरातील मेहतर समाजातील या गरीब महिलेला तब्बल २१ लाख रुपयांची लाॅटरी लागली आहे.
लॉटरी लागल्यानंतर साक्षात पांडुरंग पावला असल्याची भावना मनिषा वाघेला या लॉटरी विजेत्या महिलेने व्यक्त केली आहे.
स्वच्छतेची कामे करणारा मेहतर समाज पंढरपुरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे. या समाजातील महिला व पुरुष पंढरपूर शहरात स्वच्छतेची काम करतात. त्यानुसार मनीषा वाघेला या देखील शहरातील अनेक लोकांकडे शौचालय स्वच्छतेच काम करून यातून मिळेल त्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अर्थात हातमजुरीवर काम करून घरखर्च भागवून पोट भरत आहेत.

दर्शनासाठी गेली असता काढले लॉटरी तिकीट
दरम्यान मनीषा वाघेला यांचे पंढरपुरात मेहतर गल्लीमध्ये दहा बाय दहाचे पत्र्याचे घर आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने त्या स्वच्छतेची काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी अलीकडेच पंढरपुरातील चौफाळा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या‌. यावेळी त्यांनी सहज म्हणून शेजारीच असलेल्या लॉटरी केंद्रातून पन्नास रुपयांना २१ लाख रुपये किंमतीचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते.
सहज म्हणून तिकीट काढले. तर ध्यानीमनी नसताना त्यांना २१ लाख रुपयांची लॉटरी लागली. लाॅटरी लागल्याचे कळताच पांडुरंग पावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या पैशातून एक छोटेसे घर खरेदी करणार आणि मुलांना चांगले शिक्षण देणार असा मनोदय मनीषा वाघेला यांनी व्यक्त केला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here