प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी आज शनिवार, व उद्या रविवारी (दि.१९ व दि. २०) दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्
.
या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणी जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून योग्य ती काळजी घ्यावी. यासाठी आरोग्य विभागालाही सतर्क करण्यात आले असून उष्माघात कक्षामध्ये पुरेसे मनुष्यबळ व औषधी साठा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. अपस्मार, हदयरोग, मूत्रपिंड, यकृतविषयक आजारांमुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच द्रवपदार्थ किंवा पाणी प्राशन करावे. ओआरएस म्हणजेच तोंडाने घ्यावयाचे शरीरातले पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळाचे पाणी घ्या. हलक्या रंगाचे वजनाला हलके आणी सौलसर सुती कपडे वापरा. घराबाहेर असाल तर डोके झाका. एखादे कापड वापरा, टोपी पाला किंवा छत्री वापरा. डोळ्यांच्या सुरक्षतेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीम वापरा. अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.
याशिवाय काही बाबी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत यामध्ये प्रामुख्याने उन्हात जायचे टाळा, विशेषतः दुपारी १२ ते ०३ मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अल्कोहोल म्हणजे दारु, चहा, कॉफी, शीतपेय टाळा त्यातून शरीरात पाणी कमी होते. उच्च प्रधिनयुक्त मिठाचे प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नका. शिळे अन्न खाऊ नका. चारचाकी वाहन लावून ठेवताना त्यात लहान मुले किंवा प्राणी ठेऊ नका असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.