[ad_1]
पहलगाम हल्ला हा केंद्र शासनाचे अपयश आहे. आजवर केंद्र शासनाकडून काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे. दहशतवादी घटना संपुष्टात आल्या आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र शासनाचे सर्व दावे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पोकळे ठरले आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला तेथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती याचे आश्चर्य वाटते. याचा अर्थ आपली यंत्रणा किती गाफील आहे हे स्पष्ट होते.
हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे?
जयंत पाटील म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ला विषयावर राजकारण न करता ठोस पावले उचलली जावी. हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे? याचा शोध घेतला पाहिजे. संबंधित दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
हे सर्व धक्कादायक
जयंत पाटील म्हणाले की, दहशतवादी सहजपणे मोठ्या संख्येने पर्यटक असलेल्या ठिकाणी पोहोचतात. निरपराध आणि बेसावध पर्यटकांवर हल्ला करतात, हे सर्व धक्कादायक वाटते. लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांना सीमेहून देशाच्या आताली भागात 300 किलोमीटर अंतरापर्यंत देखील हल्ला होऊ शकतो, याचा अंदाज असायला हवा होता.
दोन दिवसांपूर्वी शरद पवारांचे वक्तव्य
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी पुण्यातील दोन कुटुंबांची शरद पवारांनी गुरुवारी सकाळी भेट घेतली. तेव्हा मृत संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरीने हल्ल्याची तपशीलवार माहिती दिली. माझ्या वडिलांना हिंदू म्हणून गोळ्या घातल्या, असे तिने शरद पवारांना सांगितले. दुसरे मृत कौस्तुभ गनबोटेंच्या पत्नी संगीता म्हणाल्या की, अतिरेकी हिंदूंना टार्गेट करत असल्याचे पाहून आम्ही महिलांनी कपाळावरील टिकल्या काढून फेकल्या. तरीही अतिरेक्यांनी आमच्या कपाळावरील कुंकू पुसले. मात्र, शरद पवारांनी शुक्रवारी असे सांगितले की, अतिरेक्यांनी हिंदू म्हणून गोळ्या घातल्याबाबतचे सत्य मला माहिती नाही. पवारांच्या पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही असेही म्हटले आहे की, ‘अतिरेक्यांनी हिंदू म्हणून गोळ्या घातल्या याचा पुरावा उपलब्ध नाही.’ दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांना सल्ला दिला आहे की, ज्यांचे नातेवाईक हल्ल्यात मारले गेले, त्यांना भेटून पवारांनी त्यांचे म्हणणे ऐकावे.
अतिरेक्यांनी अजान म्हणण्यास भाग पाडले- संगिता गनबोटे
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गनबोटेंच्या पत्नी संगिता यांनी शरद पवारांना गुरुवारी सांगितले होते की, त्या अतिरेक्यांनी आम्हा सर्व महिलांना बंदुकीच्या धाकावर अजान म्हणण्यास भाग पाडले. आणि नंतर आमच्या पतीला आमच्या डोळ्यादेखतच गोळ्या घातल्या.
[ad_2]