Nitesh Rane Reaction on Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance | स्वत:च्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा कार्यक्रम: हिंदू लोकांना मारून हिंदुत्व बळकट होणार आहे का? ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया – Mumbai News

0



शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे,

.

नितेश राणे म्हणाले, मला एक कळत नाही याने काय फरक पडणार? दोघे एकत्र आले काय, किंवा नाही आले काय? महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी कोणी एकत्र येत आहे का? हा स्वत:च्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे आतापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आलेत. आम्ही त्यांना जिहादीहृदयसम्राट म्हणतो. म्हणूनच महाकुंभावर टीका करायची आणि उद्धव ठाकरे सारख्याल जिहाद्याला खुश करायचे. हिंदुत्वाच्या विरोधात जेवढे जिहादी विचारांचे लोक आहेत. ते एकत्र येऊन हिंदुत्वाला आव्हान देत असतील, तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही भाजप, हिंदुत्ववादी विचारांचे सगळे कार्यकर्ते सज्ज आहोत.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, एकत्र येण्याचा कार्यक्रम हिंदुत्व, मराठी माणसासाठी आहे की, जिहाद्यांना ताकद देण्यासाठी आहे, जे जोर जबरदस्तीने इस्लामीकरण करतात त्यांना ताकद देण्यासाठी आहे. त्या बद्दल स्पष्ट भूमिका असली पाहिजे. हिंदू समाजाच्या विविध घटकांना मारून हिंदुत्व बळकट होणार आहे का? असा सवाल उपस्थित करत नितेश राणे यांनी मनसेवर टीका केली आहे.

एवढा हिंदीच्या सक्तीला विरोध असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोडवर जा, तिथे जाऊन उर्दूची सक्ती बंद करून मराठीची सक्ती करा. हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलता. हिंदू समाजाच्या लोकांवर का हात उचलता? बेहरामपाड्यात जाऊन सांगा, मराठीची सक्ती करा तिथे. हिंदू समाजाच्या लोकांना का मारताय? हिंदूंमध्ये का फूट पाडता? जिहाद्यांना मदत करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी, असे नितेश राणे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याच्या मुद्द्यावर म्हणाले, एकत्र येवो किंवा न येवो, आम्हाला फरक पडत नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here