ईश्वरी ऊर्फ माेनाली संताेष भिसे (३७) मृत्यू प्रकरणात वेगवेगळे चार चाैकशी अहवाल पुणे पाेलिसांना प्राप्त झाले अाहेत. यामध्ये राज्य सरकारने नेमलेल्या अाराेग्य विभागाच्या चाैकशी समितीकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अाणि प्रसूती तज्ज्ञ डाॅ. सुश्रुत दिलीप घै
.
याबाबत डाॅ. घैसास यांच्या विराेधात मृत ईश्वरी भिसे यांची नणंद प्रियंका अक्षय पाटे (रा.विश्रांतवाडी, पुणे) यांनी पाेलिसांत फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डाॅ. घैसास यांनी ईश्वरी भिसे यांची तब्येत गंभीर असतानादेखील पैशासाठी भिसे कुटुंबास वेठीस धरले. रुग्णावर साडेपाच तास काेणतेही सुवर्णकालीन उपचार (गाेल्डन हर्वस ट्रीटमेंट) केली नाही, त्यामुळे गुंतागुंत वाढत गेली अाणि रुग्णावर उपचारासाठी केलेल्या दिरंगाईमुळे रुग्णास जीव गमवावा लागला. वेळेत भरती करून उपचार केले नसल्याने डाॅ. घैसास यांच्याकडून हलगर्जीपणा झाल्याने असल्याने ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला अाहे. त्यामुळे याप्रकरणी घैसास यांच्यावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
घैसासांनी ज्युनियरला तपासण्यास सांगितले
ईश्वरी या सात महिन्यांच्या गर्भवती हाेत्या व त्यांचा २१ मार्च राेजी बीपी वाढून पाेट दुखू लागल्याने इंदिरा हाॅस्पिटल विमाननगर येथे उपचारासाठी सुरुवातीला नेण्यात अाले. उपचार सुरू असताना २८ मार्च राेजी सकाळी पाेटात पुन्हा दुखू लागल्याने रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्यांची तपासणी करून ईमजन्सीमध्ये खराडी येथील मदरहुड रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. परंतु पूर्वी ईश्वरी यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार केले असल्याने डाॅ. घैसास यांच्याशी फाेनवर चर्चा करून रुग्णालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात अाला. डाॅ. घैसास यांनी सुरुवातीस ईश्वरी भिसे यांची तपासणी ज्युनियर डाॅक्टरकडून करून घेण्यास सांगितले.