Nitesh Rane Statement I Drink Cow Urine Health Reasons | Uddhav Thackeray | Cow Urine | मी रोज गोमूत्र पितो, ते आरोग्यासाठी चांगले असते: मंत्री नीतेश राणे यांचा दावा; उद्धव ठाकरे जिहाद हृदयसम्राट असल्याची तिखट टीका – Mumbai News

0



राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी चांगल्या आरोग्यासाठी आपण रोज गोमूत्र पित असल्याचा दावा केला आहे. मवा रुह अफजा आवडत नाही. ते फार गोड असते. त्यामुळे मी रोज गोमूत्र पितो. ते आरोग्यासाठी फार चांगले असते, असे त्यांनी म्हटेल आहे. यावेळी त्यांनी उद

.

नीतेश राणे यांनी सध्या हिंदुत्वाच्या मुद्यावर प्रखर भूमिका घेतली आहे. ते यासंबंधी वेगवेगळी विधाने करून सातत्याने वादात अडकतात. सोमवारी एका पॉडकास्टमध्ये बोलतानाही त्यांनी मनसे – ठाकरे युती व हिंदुत्वासह विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी मुलाखतकर्त्याने त्यांना तुम्ही रुह अफजा पिता का? असा प्रश्न केला असता त्यांनी नकारार्थी उत्तर देत आपण रोज गोमूत्र प्राशन करत असल्याचे स्पष्ट केले.

मी रुह अफजा वगैरे पित नाही. रुह अफजा देणारा माणूस कोण? त्यावर ते अवलंबून आहे. रुह अफजा मला कुणीही चांगल्या भावनेने देणार नाही. तुम्हीच विचार करा. रुह अफजा नितेश राणेला कोण देईल? रुह अफजा फार गोड असते. ते मला आवडतही नाही. त्यामुळे मी गोमूत्र पितो. आज मी तुम्हाला सांगतो की, ते आरोग्यासाठी फार चांगले असते, असे नीतेश राणे म्हणाले.

आमच्या रक्ताचा रंग भगवाच

नीतेश राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, माझे वडील (नारायण राणे) तब्बल 39 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. उद्धव ठाकरे यांनी वाईट राजकारण केले नसते तर कदाचित आम्ही गर्वाने आम्ही शिवसैनिक असल्याचे म्हटले असते. माझ्या वडिलांनी हिंदुत्वासाठी जे काही केले, ते मी एखाद्या पॉडकास्टमध्ये सांगू शकत नाही. आम्ही 12 वर्षे काँग्रेसमध्ये होतो. तेव्हाही आमच्या रक्ताचा रंग भगवाच होता. तसेच आता भाजपमध्ये आल्यानंतरही आमच्या रक्ताचा रंग भगवाच आहे.

उद्धव ठाकरे हे जिहादहृदयसम्राट

उद्धव ठाकरे हे हिंदू विरोधी आहेत. मी त्यांना जिहादहृदय सम्राट म्हणेन. आता ते राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याची भाषा करत आहेत. पण त्यांनी हा निर्णय घेताना रश्मी वहिनींना विचारले आहे का? या दोघांनी एकत्र येण्यासाठी त्यांची मान्यता आहे का? असा उपरोधिक सवालही नीतेश राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

उल्लेखनीय बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र व मराठीच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिलेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आपसातील किरकोळ वाद मिटवण्याची तयारी दर्शवत त्यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे महाराष्ट्रात मनसे व ठाकरे गटाची आघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी उपरोक्त खोचक टोला उद्धव यांना हाणला आहे.

हे ही वाचा…

राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम:त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करणे थांबवावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. वारंवार होणाऱ्या पराभवामुळे राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

मुंबईवरील 26/11 हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात:भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप; सडकछाप म्हणत काँग्रेसचा जोरदार पलटवार

पुणे – मुंबईवरील 26/11 च्या तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते माधव भंडारी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. काँग्रेसने माधव भंडारी एक सडकछाप व्यक्ती असल्याचा आरोप करत या प्रकरणी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. वाचा सविस्तर


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here