चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी पहिली पसंत कार्तिक आर्यन नव्हे तर ‘हा’ अभिनेता होता – Pressalert

0

[ad_1]

अभिनेता भुवन अरोराने एका मुलाखतीत उघड केले की, या चित्रपटाच्या कथेचे हक्क सुशांतने स्वतः मुरलीकांत पेटकर यांच्याकडून विकत घेतले होते. सुशांतला अशा प्रेरणादायी भूमिका साकारायला खूप आवडत होत्या. याआधी त्याने ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मध्ये महेंद्रसिंग धोनी यांची भूमिका साकारली होती आणि तो चित्रपट प्रचंड गाजलादेखील होता. भुवन अरोरा म्हणाला की, एकदा विमानतळावर त्याची आणि सुशांतशी भेट झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये अभिनय आणि नवीन विषयांवर चर्चा झाली. त्यावेळीच सुशांतने सांगितले की तो एका पॅरालिम्पिक जलतरणपटूच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करणार आहे. त्याच क्षणी त्याने ‘चंदू चॅम्पियन’च्या संकल्पनेचा उल्लेख केला होता.

सुशांतने पेटकर यांची कथा सिनेमारुपात आणण्याची योजना आखली होती. पण 14 जून 2020 रोजी त्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हे स्वप्न अर्धवट राहिले. त्यानंतर ही कल्पना दिग्दर्शक कबीर खान आणि निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी पुढे नेली आणि कार्तिक आर्यनला मुख्य भूमिकेत घेण्यात आले आली.

भुवन अरोरा पुढे म्हणाला की, ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सुशांत आणि त्याच्यात झालेले संभाषण पूर्णपणे विसरून गेला होता. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला लक्षात आले की सुशांतने आधीच या चित्रपटाबद्दल त्याला सांगितले होते. भुवन म्हणाला, ‘सुशांत तिथे होता तेव्हा मी चित्रपटाचा भाग नव्हतो, पण नंतर मी तो चित्रपट केला तेव्हा सुशांत यात नव्हता.’ या चित्रपटात भुवनने कार्तिक आर्यनसोबत बॉक्सिंग चॅम्पियन कर्नेल सिंगची भूमिका साकारली होती.

हे ही वाचा: 100 पेक्षा जास्त चित्रपट, 40 फ्लॉप, 33 तर प्रदर्शित झालेच नाही; ज्याला सगळ्यांनी दिला नकार आज तोच सुपरस्टार

कार्तिक आर्यनने या भूमिकेसाठी कठोर मेहनत घेतली. शरीरयष्टीत बदल केला आणि अ‍ॅथलेटिक ट्रेनिंग घेतले. चंदू चॅम्पियन 14 जून 2024 रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळाला. मुरलीकांत पेटकर यांची ही प्रेरणादायी कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून जरी उशिरा पोहोचली असली, तरी ती आज लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here