Ajinkya rahane blame openers for the defeat GT vs KKR ipl 2025 | पुन्हा एकदा पराभव! आता अजिंक्य रहाणे कोणावर फोडले पराजयाचे खापर? म्हणाला,” मला गोलंदाजांबद्दल…”

0


KKR vs GT: गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ केकेआरला पराभवाचे सापळे पूर्णपणे तोडता आलेले नाहीत. संघाला गुजरात टायटन्सकडून या हंगामातील पाचवा पराभव पत्करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्स संघाला गुजरात टायटन्सकडून या हंगामातील पाचवा पराभव पत्करावा लागला. शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्त्वाखाली  गुजरात टायटन्सने केकेआरला त्यांच्याच घरच्या मैदानावर 39 धावांनी पराभूत केले. सलगच्या परभावनांतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane) निराश दिसला. या पराभवाचे खापर त्याने दोन खेळाडूंना आपल्या रडारवर घेतले. दोन्ही खेळाडू रहाणेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत आणि लवकर बाद झाले.

कसा रंगला सामना?

अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातची सलामी जोडी नेहमीप्रमाणे उत्तम दिसत होती. शुभमन गिलने 90 धावा केल्या तर साई सुदर्शनने 52 धावा केल्या. बटलरनेही 41 धावा करून संघाचा धावसंख्या 198 पर्यंत नेला. पण प्रत्युत्तरादाखल केकेआरच्या संघाला फलंदाजीच्या खेळपट्टीचा फायदाच घेता आला नाही. 

हे ही वाचा: शाकाहारी असूनही विराट कोहली खातो ‘हे’ खास मांस… ते काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

 

‘या’ दोन खेळाडूंना दिला दोष 

सलामीवीर फलंदाज डी कॉकच्या जागी रहमानउल्लाह गुरबाजचा संघात समावेश करण्यात आला. पण तो खेळाडूही अपेक्षांनुसार खेळू शकला नाही. रहाणेने दोन्ही सलामीवीरांना लक्ष्य केले आहे. गुरबाज फक्त 1 धाव करून बाद झाला तर नरेन 17 धावा करून बाद झाला.

हे ही वाचा: पराभवानंतर धोनीचा राग अनावर… अंपायरलाच सुनावले, ‘हे’ ठरले पराभवाचे कारण? Video Viral

 

नक्की काय म्हणाला रहाणे?

सामन्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला, ” मला वाटले की 199 धावांचे लक्ष्य साध्य करता येईल.  जेव्हा तुम्ही 199 धावांचा पाठलाग करत असता तेव्हा तुम्हाला फलंदाजांकडून चांगली सुरुवात मिळावी अशी अपेक्षा असते, संपूर्ण स्पर्धेत आपल्याला याच ठिकाणी संघर्ष करावा लागत आहे. आम्ही खरोखरच चांगली गोलंदाजी केली, पण आमची फलंदाजी कमी पडली.”

हे ही वाचा: महिलांशी अनैतिक संबंध, हुंड्याची मागणी आणि मारहाण… शमीनंतर आता ‘या’ भारतीय क्रिकेटपटूवर पत्नीचा गंभीर आरोप

 

सलामीवीरांना ठरवले ‘दोषी’ 

रहाणे पुढे म्हणाला, ‘आम्हाला  शक्य तितक्या लवकर शिकण्याची आणि पुढे जात राहण्याची गरज आहे. आम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल, मधल्या षटकांमध्येही चांगली फलंदाजी करावी लागेल. इथेच आपण संघर्ष करत आहोत. जेव्हा तुम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असता तेव्हा तुम्हाला सुरुवातीच्या फलंदाजांकडून चांगली सुरुवात अपेक्षित असते. फलंदाजी युनिट म्हणून आम्हाला यात सुधारणा करायची आहे, आमच्या गोलंदाजांबद्दल कोणतीही तक्रार नाही.” 

 




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here