जीवघेण्या हल्ल्याच्या तीन महिन्यानंतर सैफ अली खानने कतारमध्ये घेतलं नवं घर, म्हणाला, ‘सुरक्षित आणि…’ – Pressalert

0

[ad_1]

Saif Ali Khan New House: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याल्या तीन महिने पूर्ण झाले आहे. या हल्ल्याला तीन महिने होताच सैफने कतारमध्ये अलिशान घर खरेदी केले आहे. कतारमध्ये नवीन घर खरेदी केल्यानंतर सैफने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये याबाबत माहिती दिली होती. त्याचबरोबर कतारमधील सौंदर्य आणि सुरक्षा याचेही कौतुक केले आहे. त्याने म्हटलं आहे की, कुटुंबासाठी हे घर म्हणजे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. सैफचे हे नवीन घर कतारमधील सेंट रेजिस मार्सा अरेबिया आयलंड-द पर्ल येथे असलेल्या द रेसिडेन्समध्ये आहे

सेकंड होम किंवा दुसऱ्या घरांबाबत विचार केल्यास अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांवर मी बारकाईने विचार करतो. एक तर ते घर जास्त दूर नको तिथे आरामात व पटकन पोहोचता यावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिथे सुरक्षा असायला हवी हे  घर तसंच आहे. इथला कॉन्सेप्ट खूप छान आहे. आयलँडमध्ये आयलँड असणं खूपच लक्झरी आणि सुंदर आहे. मी एका कामासाठी इथे आलो होता. शूटिंग करत असताना मी या प्रॉपर्टीवर राहिलो होतो. तेव्हा पाहिले की प्रायव्हसी आणि लक्झरी दोन्ही येथे आहे. जेवणदेखील मला आवडतं तसं बनवण्यात आलं होतं. मी माझ्या कुटुंबाला येथे घेऊन येण्यास खूप उत्सूक आहे. माझी दोन्ही मुलं तैमूर आणि जेह दोघांनाही येथे यायला आवडेल, असं सैफ म्हणाला आहे. 

जानेवारीमध्ये सैफ अली खानवर हल्ला झाला होता. त्याच्या राहत्या घरीच चोरीच्या उद्देशाने आलेल्या आरोपीने त्याच्यावर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. 5 दिवस त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून अलीकडेच मुंबई पोलिसांनी हजार पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. त्यात अनेक नवीन खुलासे करण्यात आले आहेत. 

सैफकडे किती संपत्ती?

सैफच्या प्रॉपर्टीबद्दल बोलायचे झाल्यास त्याचे वांद्रे येथील आपर्टमेंटमध्ये एक अलिशान घर आहे. त्याचबरोबर पटौदी पॅलेसचादेखील तो मालक आहे. या व्यतिरिक्त लंडन आणि जीस्ताद (स्विझरलँड)मध्येही त्याची संपत्ती आहे. मीडिया रिपोर्टनुसार सैफ अली खानची एकूण संपत्ती जवळपास 1200 कोटी आहे. तो प्रत्येक सिनेमासाठी जवळपास 10-15 कोटी रुपये मानधन घेतो. तसंच ब्रँडच्या प्रमोशनमधून 1.5 कोटी रुपये कमावतो

प्रोफेशनल लाइफ

सैफच्या प्रोफेशनल लाइफबाबत बोलायचे झाल्यास तो आता ज्वेल थीफमध्ये चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि निकीता दत्ता दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here