हिंगोली तालुक्यातील सागद येेथे पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी महिलांनी मंगळवारी ता. २२ दुपारी जिल्हा परिषदेवर हंडामोर्चा काढला. यावेळी दलित वस्तीची विंधन विहीर खाजगी व्यक्तीच्या शेतात असून त्या ठिकाणावरून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही महिलांनी क
.
या संदर्भात सागद येथील महिला अर्चना गरड, सुमनबाई इंगोले, वंदना हनवते, ज्योती मोरे, ज्योती प्रकाश मोरे, सोनुबाई मनवर, गिताबाई भगत, कांताबाई धवसे, गयाबाई इंगोले, सौमित्राबाई खडसे, अर्चना भगत, शारदा इंगोले, सुनंदा धुळे, मालताबाई धुळे, निलीमा इंगोले, सविता वाढवे यांच्यासह महिलांनी आज जिल्हा परिषदेवर हंडामोर्चा काढला.
यावेळी महिलांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. गावात जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. या शिवाय जल जीवन मिशन अंतर्गत विहीर घेण्यात आली असून त्या ठिकाणीही पाणी नाही. त्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ लागली आहे. सध्या उन्हाचा पारा वाढला असून या उन्हात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
दरम्यान, गावातील दलित वस्तीमधे पाणी पुरवठ्यासाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आली होती. मात्र सदर विंधन विहीर एका शेतात घेण्यात आली आहे. सदर शेतकरी सदर विंधन विहीर आपल्याच मालकीची असल्याचे सांगत पाणी देण्यास नकार देत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. प्रशासनाने सदर विंधन विहीरीचे पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच जलजीवन मिशन योजनेचे काम तातडीने पूर्ण करून गावकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवावा अन्यथा जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, महिलांच्या आंदोलनानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने गावात पाणी पुरवठा करण्याच्या हालचाली सुरु केल्याचे सांगण्यात आले आहे.
चौकटीचा मजकूर वसमत येथेही सोमवार पेठ व इतर भागातील महिला व नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या भागात तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली