[ad_1]
आखाडा बाळापूर पोलिस ठाणे अंतर्गत कृष्णापुर शिवारामध्ये कालव्यात वाहून गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी ता 23 आढळून आला आहे. घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिस दाखल झाले असून याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक
.
आखाडा बाळापूर पोलिस ठाणे अंतर्गत कृष्णापुर येथील पवन गोरे हा 14 वर्षाचा मुलगा इयत्ता आठवी वर्गात शिक्षण घेतो. मंगळवारी ता. 22 सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पवन हा मित्रासोबत उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता. कालव्यात पोहत असताना तो खोल पाण्यात गेला. यावेळी पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून जाऊ लागला. यावेळी त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. पवन हा पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येतात त्याचे मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न सफल झाला नाही.
या प्रकाराची माहिती त्याच्या मित्रांनी पवन याच्या कुटुंबीयांना दिली. या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार राजेश घोंगडे, शिवाजी पवार, राजीव जाधव, शेख अन्सार, रामदास ग्यादलवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने पवन याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालवला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी शोध मोहीम थांबवली.
दरम्यान आज सकाळी पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पवन याचा मृतदेह कालव्यात आढळून आला. या घटनेमुळे कृष्णापुर गावावर शोककळा पसरली आहे. मयत पवन याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
[ad_2]