[ad_1]
निघोज येथील मळगंगा देवीची मंगळवारी सकाळी ७.३० वाजता घागर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीवर यंदा प्रथमच ड्रोनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. राज्यभरातून आलेल्या सुमारे दीड लाख भाविकांनी देवी श्रींच
.
या श्रींच्या घागर मिरवणुकीची सांगता पुन्हा देवीच्या हेमाडपंथी बारवेत करण्यात आली. पुजारी संतोष गायखे यांनी बारवेत पूजा करुन पाण्यात घागरीचे विसर्जन केले. बुधवारी दुपारी चार वाजता कुस्ती हगामा होणार आहे. खासदार नीलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, माजी तालुकाध्यक्ष वसंत चेडे, सरपंच दत्ता नाना पवार, सरपंच पंकज कारखिले, देवीभोयरे सरपंच अशोकराव मुळे, वडनेर सरपंच राहुल सुकाळे आदिंनी देवीचे दर्शन घेतले. सूत्रसंचालन मळगंगा ट्रस्ट विश्वस्त अनिल लंके व माजी उपसरपंच उमेश सोनवणे यांनी केले.
राज्यातून आलेल्या भाविकांनी देवीला दिला पुरण पोळीचा नैवेद्य राज्यातून आलेल्या भाविकांनी देवीला दंडवत घालून मिरवणुकीने शेरणीच्या प्रसादाचे वाटप केले. भाविकांनी सवाष्णी कार्यक्रम करीत माता मळगंगा देवीला पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण केला. दुपारी चार वाजता देवीच्या ८५ फूट उंचीची काठी तसेच पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सायंकाळी रांजणखळगे कुंड या ठिकाणी असलेल्या मळगंगा मंदिराच्या शिखराला लागल्यानंतर कुंडाची यात्रा सुरू झाली.
[ad_2]