[ad_1]
Sai Pallavi ही साऊथची दमदार आणि हायएस्ट पेड अभिनेत्री असून अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. साई पल्लवीने आपल्या करिअरमध्ये सर्वोत्तम सिनेमे दिले आहे. आता तिच्या 7 वर्षांपूर्वीच्या थ्रिलर सिनेमाची चर्चा आहे. हॉरर अशा या सिनेमात साई पल्लवीने दमदार अभिनय केला आहे. हा सिनेमा आता OTT वर धुमाकूळ घालत आहे.
साई पल्लवीच्या ‘दिया’ या सिनेमाची 7 वर्षांपूर्वी देखील चर्चा झाली. त्यावेळी हा सिनेमा गोंधळवणारा आणि अतिशय साधा वाटला . पण आता हाच सिनेमा OTT वर प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. तेलुगुमध्ये या सिनेमाचं नाव ‘कनम’ असं होतं. एएल विजय यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा OTT वर उपलब्ध आहे.
काय आहे सिनेमाची कथा?
या सिनेमाची सुरुवात 18 वर्षांच्या तुलसी म्हणजे साई पल्लवी आणि कृष्णा म्हणजे नागा शौर्य यांच्यापासून होते. या सिनेमात त्यांचे पालक त्यांना ओरडताना दिसत आहेत. तुलसी तेव्हा गरोदर असते. या दोघांचे पालक पाच वर्षांनी लग्न लावून द्यायला तयार असतात. पण तिला गर्भपात करायला सांगतात. तुलसीला ते बाळ हवं असतं, पण…
यानंतर सिनेमाची कथा अतिशय वेगळी आहे. पाच वर्षांनी लग्न होतं. पण त्या लग्नात खूप ट्विस्ट पाहायला मिळतात. हे ट्विस्ट काय आहेत ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच या सिनेमातील हॉरर पार्ट तुम्हाला हादरवून टाकतो.
कुठे पाहता येईल हा सिनेमा
साई पल्लवी व्यतिरिक्त या चित्रपटात नागा शौर्य, वेरोनिका अरोरा, प्रियदर्शी, आरजे बालाजी, गांधारी नितीन, रेखा आणि सुजिता यांसारखे अनेक कलाकार होते. त्याच्या तमिळ आणि तेलुगू आवृत्त्या OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहता येतील, तर त्याची हिंदी डब केलेली आवृत्ती YouTube वर पाहता येईल.
[ad_2]