शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पहलगाम हल्ल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजचे भाषण निव्वळ वल्गना असल्यासारखे होते. सरकारने अतिरेक्यांना पुलवामा हल्ल्
.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी अतिरेक्यांनी पर्यटकांवर भीषण हल्ला केला. त्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांसह एकूण 26 जण मारले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहार येथील एका सभेत बोलताना या हल्ल्यावर भाष्य केले. तसेच अतिरेक्यांना कोणत्याही किंमतीत सोडणार नसल्याचा संकल्प व्यक्त केला. पहलगाम हल्ल्यामुळे अवघा देश दुःखी झाला आहे. या हल्ल्यात कुणी आपला मुलगा, कुणी भाव तर कुणी आपला जोडीदार गमावला आहे. त्यातील प्रत्येकजण वेगवेगळे भाषिक होते. पण या सर्वांचे दुःख व आक्रोश एकसारखाच आहे.
हल्ला हल्ला केवळ पर्यटकांवरच झाला नाही तर शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. मी स्पष्ट शब्दांत सांगतो की, ज्यांनी हा हल्ला केला व ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला, त्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी कठोर शिक्षा दिली जाईल. आता उरलेल्या अतिरेक्यांनाही मातीत गाडण्याची वेळ आली आहे. त्यांचे अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे, असे मोदी म्हणाले.
मोदींचे भाषण निव्वळ वल्गना वाटले
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणावर तिखट टीका केली. पहलगाम हल्ला हा आमच्या सार्वभौमत्त्वावरील हल्ला आहे. भारतीय म्हणून भारत सरकारसह आम्ही ठामपणे लढण्यास सिद्ध आहोत. मात्र पंतप्रधानांच आजच भाषण निव्वळ वल्गना वाटलं. उरी-पठाणकोट-पुलवामा झाले तेव्हाच धडा शिकवला असता तर आज ही वेळ आली नसती. आधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.
तिरेकी हल्ल्यावेळी मोदी देशाबाहेर कसे असतात?
विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी बुधवारी अतिरेकी हल्ल्यावेळी मोदी देशाबाहेर कसे असतात? असा प्रश्न उपस्थित करत माध्यमांवर निशाणा साधला होता. मोदी फोनवरून कसे संपर्कात, अमित शहा कसे पोहोचले हे पुन्हा पुन्हा रिवाइंड करून दाखवण्यापेक्षा, तेथे सुरक्षितता का नव्हती? आतंकवादी एवढ्या आत पोहोचेपर्यंत सुरक्षामंत्रालय काय करत होतं? पुलवामा आणि आता पहलगाम, नेमके हल्ल्याच्या वेळीच मोदीजी देशाबाहेर कसे असतात? हेही प्रश्न विचारा ना, असे त्या म्हणाल्या होत्या.
हे ही वाचा…
हिंदू कोण असे विचारत गोळ्या घातल्या:मोने कुटुंबीयांनी सांगितला थरार; डोळ्यांदेखत बाबा, काकांना संपवलं म्हणत लेकीने फोडला टाहो!
मुंबई – काश्मीरच्या रम्य थंड हवेत काही आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गेलेल्या तिन्ही मावस भावंडांच्या कुटुंबांवर अचानक अतिरेक्यांनी घाला घातला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात घरातील कर्ते पुरुष अतुल मोने (43), संजय लेले (50) आणि हेमंत जोशी (45) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने डोंबिवलीत हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. यानंतर अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, हिंदू कोण आहे विचारत गोळी घातली. वाचा सविस्तर