माजी प्राचार्यांकडून महिलेचा विनयभंग:परतवाडा येथे शिक्षिकेच्या घरात घुसून गैरवर्तन; पोलिसांचा शोध सुरू

0




परतवाडा शहरातील एका प्रतिष्ठित शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य अविनाश कडू (६०) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडू हे सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असून सिद्धार्थ हायस्कूल मागील गोवर्धन विहार येथे राहतात. एका खासगी शाळेतील अस्थायी शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला अश्लील एसएमएस व व्हॉइस कॉल करून त्रास दिला. १ मे रोजी रात्री ९.३० वाजता त्यांनी महिलेला फोन करून ‘घरी येतो’ असे सांगितले. घाबरलेल्या महिलेने त्यांना सकाळी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी तिच्या घरी आला आणि वाईट उद्देशाने वागू लागला. याच वेळी महिलेचे पती घरी आले. त्यांनी कडू यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने शिवीगाळ केली. परतवाडा पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ७९, ३३३, ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पथक आरोपीच्या मागावर असून लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांनी माजी प्राचार्यांच्या वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here