Selenium Heart Health: बहुतेक लोकांना कॅल्शियम, जीवनसत्त्वे, पोटॅशियम यासारख्या पोषक तत्वांबद्दल माहिती असेल. पण आपल्यापैकी अनेकांना सेलेनियमबद्दल माहिती नसेल. सेलेनियम हे एक अँटिऑक्सिडेंट आहे. जे शरीराला हृदयविकारापासून वाचवू शकते. यासोबतच सेलेनियम शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवू शकते.
हृदयविकाराचा धोका होईल कमी
सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलनुसार, सेलेनियमचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकाराच्या झटक्यासारख्या हृदयाशी संबंधित समस्या टाळता येतात. राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षणानुसार सेलेनियमचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहू शकते. थोड्या प्रमाणातले सेलेनियम तुमच्या शरीरात मोठी भूमिका बजावू शकते. सेलेनियमचे सेवन केल्याने ताण कमी होतो आणि हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.
सेलेनियम कोणत्या गोष्टींमध्ये आढळते?
ब्राझील नट्समध्ये सेलेनियम आढळते. निरोगी हृदय ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात सेलेनियमचा समावेश करू शकता. 100 रुपयांहून कमी किंमतीत मिळणाऱ्या असे अनेक पदार्थ खाऊन तुम्ही हृदय निरोगी ठेवू शकता. याबद्दल जाणून घेऊया.
अंडी
अंड्यांमध्येही सेलेनियम आढळते. एका अंड्यामध्ये सुमारे 15 मायक्रोग्राम सेलेनियम आढळते. सेलेनियमसाठी पुरुष 2 ते 3 अंडी खाऊ शकतात. तर महिला 1 ते 2 अंडी खाऊ शकतात.
चीज
चीजमध्येही सेलेनियम आढळते. हृदयाशी संबंधित आजार टाळण्यासाठी तुम्ही चीजचे सेवन करू शकता.
पालक
पालक सारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्येही सेलेनियम आढळते. सेलेनियमसाठी, आहारात हिरव्या पालेभाज्या खाव्यात.
शरीराला किती सेलेनियमची आवश्यकता आहे?
WHO नुसार एका पुरूषाला दररोज 34 ug सेलेनियमची आवश्यकता असते. तर महिलांना 26 Ug सेलेनियमची आवश्यकता असते. गर्भवती महिलांना सेलेनियमची जास्त गरज असते. 14 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 55 मायक्रोग्रॅम सेलेनियमची आवश्यकता असते.
(Disclaimer – प्रिय वाचक, ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद. ही बातमी फक्त माहिती देण्यासाठी लिहिली आहे. हे लिहिताना आम्ही घरगुती उपचार आणि सामान्य माहितीची मदत घेतली आहे. ‘झी 24 तास’ याला दुजोरा देत नाही. आरोग्याशी संबंधित माहिती स्वीकारण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.)