[ad_1]
स्वामी समर्थ महाराज की… जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… असा नामघोष करत भक्तिमय वातावरणात स्वामी समर्थांची पुण्यतिथी सोहळा मंगळवेढ्यातील येथील सप्तशृंगी नगरमधील ढवळस रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ मंदिरात पार पडला. श्री स्वामी समर्थ महारा
.


शनिवारी सकाळी ६ ते ९ स्वामी समर्थ मूर्ती अभिषेक करण्यात आला. त्यानंतर होम हवन करण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत बाळकृष्ण बळवंतराव महाराज यांचे श्री स्वामी समर्थ चरित्रावर कथेचे निरूपण केले. दुपारी १२:१० वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
प्रतिनिधी | अक्कलकोट श्री दिगंबरा दिगंबरा…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा…. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज कि… जय श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय…च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात पुण्यतिथीनिमित्त शनिवारी पहाटे रथोत्सव, विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम, पारायण, महाप्रसाद, रक्तदान, व जिम्नॅशियमचा १७ वा वर्धापन दिन, मान्यवरांच्या भेटी व सत्कार आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अन्नछत्र मंडळात लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. न्यासाने केलेल्या नेटक्या नियोजनाने भक्तातून समाधान व्यक्त करण्यात आले असून, अन्नछत्र मंडळात भक्तीचा मळा फुलला. गेल्या सहा दिवसांपासून श्री स्वामी समर्थ रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रथोत्सवाचा शेवट दिवस असल्याने सर्व अमोलराजे मित्र मंडळ व स्वामीभक्तांनी रात्री दीड वाजता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उपस्थित राहून श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पूजनानंतर न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते रथाचे पूजन करून बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठाकडे पालखी मार्गावरून रथ मार्गस्थ करण्यात आले. महाप्रसादालयात सकाळी स्वामींचे चरित्र पोती पारायण संपन्न झाले. सकाळी ११.३० वाजता श्री व अन्नपूर्णा, महाप्रसादाचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे व मनसेचे राज्य उपाध्यक्ष विनायक म्हशीलकर, डॉ. प्रसाद प्रधान यांच्यासह स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अन्नछत्र मंडळातील नैवेद्य श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, बुधवार पेठेतील समाधी मठात श्रींना दाखवण्यात आले. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अक्कलकोटमध्ये अन्नछत्र मंडळात भाविकांनी महाप्रसाद घेतला.
शनिवार पेठेत पुष्पवृष्टी शनिवारी (दि. २६) शनिवार पेठ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरा पुण्यतिथीनिमित्त पुष्पवृष्टी करण्यात आली. सकाळी १० वाजेपासून मंदिरात भजनास सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता भक्तांनी पुष्पवृष्टी केली. आरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप केला. देशभरातून भक्तांची मांदियाळी महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंद्रप्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, उत्तराखंड, दिल्ली व जम्मू काश्मीर, कोलकाता, राजस्थान, उत्तर प्रदेश यासह देश व विदेशातील स्वामी भक्तांनी तीर्थक्षेत्री अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतला.
पारायण अन् अभंगवाणी गुरुवारपासून (दि. २४) ते शनिवार (दि. २६) पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात रेणुका महिला भजनी मंडळ मंगळवेढा , स्वामी समर्थ भजनी मंडळ मंगळवेढा यांनी सहभाग नोंदवला. शुक्रवारी जवळपास महिला व पुरुष असे ५० जणांनी सेवा केली. सायंकाळी ४ वाजता इंद्रधनु भजनी मंडळ मंगळवेढा (कल्पेश कांबळे) आणि सायंकाळी ६ वाजता सोलापूर येथील “स्वरध्यास संगीत विद्यालय प्रस्तुत अभंगवाणी हा कार्यक्रम झाला.
[ad_2]