[ad_1]
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक तथा मोस्ट वाँटेड ड्रग सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकरचे वडील गुरु चिचकर यांनी आज आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून स्वतःची जीवनयात्रा संपवली. नवीन चिचकर यांच्यावर नार्कोटिक्स विभागाकड
.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरु चिचकर यांनी शुक्रवारी सकाळी 6.30 वा. स्वतःच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईट नोटमध्ये त्यांनी नार्कोटिक्स विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. गुरु चिचकर यांचा मुलगा नवीन चिचकर हा भारतातील मोस्ट वाँटेड ड्रग सिंडिकेटचा प्रमुख आहे. तो तपास यंत्रणांना विविध गुन्ह्यांत हवा आहे. या प्रकरणी नार्कोटिक्स विभागाने विविध गुन्हे दाखल केलेत.
त्यानंतर तो भारतातून परदेशात पसार झाला आहे. तो सध्या तेथूनच आपले ड्रग रॅकेट चालवतो. एनसीबीने त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी केली होती. तेव्हापासून गुरु चिचकर हे तणावात होते. पोलिस वेगवेगळ्या संदर्भात त्यांची चौकशी करत होते. या चौकशीला कंटाळून त्यांनी आज सकाळी 9 एमएम पिस्तूलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असे सांगितले जात आहे.
नवीन चिचकर हा ड्रग तस्करीचा माफिया
पोलिसांच्या माहितीनुसार, नवी मुंबईतला रहिवासी असणारा नवीन चिचकर हा ड्रग्ज तस्करीचा माफिया म्हणून समोर आला आहे. चिचकर हा सध्या परदेशात स्थायिक झाला आहे. पण मागील काही वर्षांपासून तो त्याच्या येथील साथीदारांमार्फत ड्रग्जची तस्करी करतोय. चिचकरने क्रिमिनल सायकॉलॉजीचा अभ्यास केला असून लंडनमध्ये फिल्म अँड टेलिव्हिजनचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. सध्या तो ड्रग तस्करीच्या प्रकरणात फरार आहे.
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने महिन्याभरापूर्वी सर्वात मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला होता. तसेच या प्रकरणी 6 जणांना अटक केली होती. हे रॅकेट मागील वर्षभरापासून सुशिक्षित तरुणांकडून चालवले जात होते. एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा प्रकारे या तरुणांनी आपली गँग तयार तयार केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी तिघांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेत होते, असे पोलिसांनी सांगितले होते.
चिचकरची गँग ही कोकेन आणि हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक वीडची तस्करी करत होती. हे अंमली पदार्थ अमेरिकेतून विमानाने मुंबईत आणले जाते होते. आणि त्यानंतर देशभरात पोहोचवले जात होते. काही मादक पदार्थांची या टोळीने ऑस्ट्रेलियातही विक्री केली होती.
[ad_2]