IPL 2025 CSK new ball seamer Ricky Ponting Wife Kids Embrace One Another After PBKS Match Watch Video

0


Ricky Ponting Wife Video: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जदरम्यान झालेला सामना जिंकत पंजाबने चेन्नईचं स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आणलं. मंगळवारी चेपॉकच्या मैदानात झालेल्या या सामन्यानंतर चेन्नईच्या संघातील एक वेगवान गोलंदाजच चक्क पंजाबचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगच्या पत्नीला मिठी मारली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्जच्या संघानेच हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या खेळाडूचा पॉन्टिंग कुटुंबाशी काय संबंध?

ज्या खेळाडूने रिकी पॉन्टिंगच्या कुटुंबाला मिठी मारली त्याचं नाव आहे खलील अहमद! खलील अहमद यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळायचा. यंदाच्या पर्वात खलील अहमद चेन्नईकडून खेळत असला तरी यापूर्वीच्या अनेक पर्वांमध्ये तो जेव्हा दिल्लीकडून खेळला तेव्हा दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगच होता. त्यामुळेच खलील अहमद आणि रिकी पॉन्टिंगच्या कुटुंबाचं एक खास नातं तयार झाला. मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये खलील अहमदने 3.4 ओव्हरमध्ये 28 धावा दिल्या.

रिकी पॉन्टिंगही तिथे पोहोचला अन्…

चेन्नईचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने सामना संपल्यानंतर पंजाबच्या संघाचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगची पत्नी आणि मुलांना मिठी मारली. खलील अहमद पॉन्टिंग कुटुंबाकडे चालत गेला आणि त्याने या कुटुंबाला मिठी मारली. त्यानंतर रिकी पॉन्टिंग तिथे आला आणि त्यानेही खलील अहमदबरोबर कुटुंबासहीत सेल्फीसाठी पोज दिली. 

यंदाच्या पर्वातही प्रभावी कामगिरी

खलील अहमदने यंदाच्या पर्वामध्ये एकूण 14 विकेट्स घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये तो चौथ्या स्थानी आहे. मैदानातील कामगिरीबरोबर मैदानाबाहेरही त्याने आपल्या आधीच्या प्रशिक्षकांबरोबरचं नातं कायम ठेवल्याचं या व्हायरल व्हिडीओमधून दिसत आहे. तुम्हीच पाहा चेन्नईच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ…

चेन्नईचा पत्ता कट

या सामन्यामध्ये चेन्नईला पंजाबने 4 विकेट्स राखून पराभूत केलं. त्यामुळेच पाच वेळा आयपीएल जिंकणारा चेन्नईचा संघ 18 व्या पर्वातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. पंजाबच्या संघाकडून युजवेंद्र चहलने हॅटट्रीक घेतली. मात्र सॅम करनने 47 बॉलमध्ये 88 धावा करत चेन्नईला 190 धावांपर्यंत पोहचवण्यात मदत केली. मात्र पंजाबकडून श्रेयस अय्यरने केलेल्या 72 धावा आणि प्रभसिमरन सिंगने केलेल्या 54 धावांच्या जोरावर हा धावांचा डोंगर सहज सर झाला. 




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here