[ad_1]
फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात हजारो वर्षांपूर्वीचे आसरा मातेचे बारव व हेमाडपंती महादेव मंदिर आहे. हे मंदिर जमिनीपासून चाळीस ते पंचेचाळीस फूट खोल चिऱ्यामध्ये कोरलेले आहे. मंदिरात मूर्ती नाही. बारवेची खोली आजपर्यंत कुणालाही माहीत नाही. या मंदिराचे सं
.

हे देवस्थान पाहण्यासाठी अनेक पुरातन वारसा जपणाऱ्या संस्थांनी पाहणी केली. अभ्यास सुरू आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, आळंद परिसरात आणखी काही बारवा आहेत. त्या बारवा अजूनही जमिनीत गाडलेल्या आहेत. गुढीपाडव्याला येथे १३ दिवस यात्रा भरते. २०१२ मध्ये विश्वस्त मंडळ स्थापन झाले. त्यानंतर मंदिराचा कारभार मंडळ पाहत आहे. हे देवस्थान तीर्थक्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. या मंदिरात आतापर्यंत अनेक जण वरून ५० फूट खोल पडले. मात्र कुणालाही दुखापत झाली नाही. ही माता नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यासह परराज्यातून भाविक येथे नवस बोलण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी येतात. हे देवस्थान पाहून भाविक आश्चर्यचकित होतात. मंदिराचे वैशिष्ट्य, खोली आणि मूर्ती नसलेले स्वरूप यामुळे हे देवस्थान आगळेवेगळे ठरते.
भाविकांसाठी कंदुरीचेही होते नियमित आयोजन मंदिरात लहान मुलांचे पहिले केस म्हणजे जावळ काढण्याची शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा आहे. गावातील किंवा परिसरातील मुलगी इतर जिल्ह्यात किंवा परराज्यातसुद्धा गेल्यानंतर वाण देण्यासाठी वर्षातून एकदा येतेच. मंदिरात खणा-नारळाची ओटी भरली जाते. मुले जन्माला आल्यानंतर त्याचे जावळ काढण्यासाठीसुद्धा इथेच यावे लागते. अनेक भाविकांकडून इथे बोकड्याच्या कंदुरीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यासाठी संस्थानकडून भांडी, शेड, पाण्याची व्यवस्था केली जाते.
[ad_2]