IPL 2025 : मंगळवारी आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC VS KKR) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीच्या होम ग्राउंडवर केकेआरने 14 धावांनी सामना जिंकला. सामन्यानंतर दिल्लीचा खेळाडू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि केकेआरचा खेळाडू रिंकू सिंह (Rinku Singh) हे समोरासमोर आले. दोघे एकमेकांसोबत संवाद साधत असताना कुलदीपने रिंकूच्या कानशिलात लगावली. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र आता या घटनेविषयी आणि व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबत कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या ऑफिशल अकाऊंटवरून स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मंगळवारी दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना संपल्यावर सर्व खेळाडू मैदानात एकत्र येत एकमेकांशी बोलत होते. यावेळी कुलदीप यादव आणि रिंकू सिंह हे दोघे देखील समोरासमोर आले. दोघांमध्ये काहीतरी बोलणं सुरु होतं तितक्यात कुलदीपने रिंकू सिंहच्या कानशिलात लगावली. थोड्यावेळाने पुन्हा एकदा कुलदीपने रिंकूला मारले. व्हायरल व्हिडीओमध्ये रिंकू कुलदीपच्या या कृतीमुळे नाराज झालेला दिसला नाही, उलट दोघे हसत होते. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाला. यात काहींनी कुलदीपने रागात रिंकूवर हात उचलला असे दावे केले. यावर आता कोलकाता नाईट रायडर्सने एक पोस्ट शेअर करून स्पष्टीकरण दिले आहे.
KKR ने व्हिडीओ केला शेअर :
कोलकाता नाईट रायडर्सने कुलदीप आणि रिंकूचा अजून एक व्हिडीओ पोस्ट केला, यात त्यांनी कुलदीप आणि रिंकू हे दोघे खूप चांगले मित्र असून कुलदीपने गंमतीत सामन्यानंतर रिंकू सिंहवर हात उचलला असल्याचे सांगितले. त्यांनी या पोस्टला कॅप्शन देत म्हंटले, ‘मीडिया (सनसनी) विरुद्ध (मित्रांच्या मधील मस्ती) सत्य’ घनिष्ट मैत्री = आमचे प्रतिभावान यूपी बॉईज’. केकेआरने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये कुलदीप आणि रिंकूची मैत्री किती घट्ट आहे आणि दोघे एकमेकांच्या किती जवळचे मित्र आहेत हे दाखवणारे काही फोटो आणि व्हिडीओ क्लिप शेअर केल्या.
हेही वाचा : ‘टीम ओनरशिपमुळे…’ सासऱ्यांनी सांगितलं KL Rahul च्या परफॉर्मन्सच गुपित, VIDEO
पाहा व्हिडीओ :
KolkataKnightRiders (KKRiders) April 30, 2025
केकेआरचा दिल्लीवर विजय :
अरुण जेटली स्टेडियमवर मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले. केकेआरच्या फलंदाजांनी 9 विकेट गमावून 204 धावा केल्या, आणि देखील विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करण्यात दिल्लीचा संघ अपयशी ठरला आणि त्यामुळे कोलकाताने स्पर्धेतील त्यांचा चौथा सामना जिंकला.