[ad_1]
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर केंद्राने देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वच राज्यांना यासंबंधीचे दिशानिर्देश दिलेत. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारही यासंबंधीची पाऊले उचलत असताना राज्यातील 48 शहर
.
योगेश कदम ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाले की, अमित शहा यांच्या आदेशानंतर राज्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. त्यात राज्यातील 48 शहरांत 5023 पाकिस्तानी नागरीक आढळलेत. यापैकी 107 जण बेपत्ता असून, त्यांचा कोणताही पत्ता तपास यंत्रणांना लागत नाही. राज्यात सर्वाधिक 2458 पाकिस्तानी नागपूर शहरात आढळलेत. त्यानंतर ठाण्यात 1106, तर मुंबईत 14 पाकिस्तानी राहत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे यापैकी केवळ 51 पाक नागरिकांकडेच वैध दस्तऐवज आढळलेत.
वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्यांना 2 दिवस वाढीव
योगेश कदम म्हणाले, आजमितीस महाराष्ट्रात 5 हजार 23 पाक नागरीक आहेत. यातील एक कॉलम अनट्रेसेबल पाक नागरिकांचा आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. भारतीय यंत्रणांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवायचे आहे. पण त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही. तूर्त सार्क व्हिसा व शॉर्ट टाईम व्हिसावर आलेल्या पाक नागरिकांना 2 दिवसांत म्हणजे 28 तारखेपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले.
जे पाकिस्तानी वैद्यकीय उपचारांसाठी येथे आलेत. त्यांना 2 दिवस वाढवून देण्यात आलेत. त्यांनी 30 तारखेपर्यंत भारत सोडायचा आहे. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करणे अजून सुरू असल्यामु्ळे या आकडेवारीत बदल होऊ शकतो, असेही योगेश कदम यांनी याविषयी बोलताना सांगितले.
खाली वाचा कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी?
अकोला | 22 |
अहिल्यानगर | 14 |
अमरावती | 118 |
छत्रपती संभाजीनगर | 59 |
भंडारा | 0 |
बीड | 0 |
बुलढाणा | 7 |
चंद्रपूर | 0 |
धुळे | 6 |
धाराशिव | 0 |
गडचिरोली | 0 |
गोंदिया | 5 |
हिंगोली | 0 |
जळगाव | 393 |
जालना | 5 |
कोल्हापूर | 58 |
लातूर | 8 |
मुंबई | 28 |
नाशिक | 10 |
नागपूर | 2458 |
नांदेड | 4 |
नंदुरबार | 10 |
नवी मुंबई | 239 |
परभणी | 3 |
पालघर | 1 |
पिंपरी चिंचवड | 290 |
पुणे | 114 |
रायगड | 17 |
रत्नागिरी | 4 |
सातारा | 1 |
सांगली | 6 |
कोल्हापूर | 17 |
सोलापूर | 0 |
सिंधुदुर्ग | 0 |
ठाणे | 1106 |
वर्धा | 0 |
वाशिम | 6 |
यवतमाळ | 14 |
एकूण | 5023 |
हे ही वाचा…
आर्मी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास तयार:पण सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रकाश आंबेडकर यांचा मोदी सरकारवर आरोप
पुणे – पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. पण सरकारमध्ये असे काही करण्याची राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना केली. वाचा सविस्तर
2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री:बावनकुळेंच्या दाव्यावर शिंदेंनी जोडले हात; कदम म्हणाले – 2034 कशाला 2080 पर्यंत राहू द्या!
मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हात जोडत’ बोलणे टाळले, तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी 2034 कशाला 2080 पर्यंत त्यांना मुख्यमंत्री राहू द्या असे म्हणत भाजपला असा टोला हाणला आहे. त्यामुळे महायुतीत या मुद्यावरून मोठी ताणातान होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
[ad_2]