[ad_1]
समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे कोणती ना कोणती कला असते. ज्येष्ठ व्यक्तींनी त्यांच्याकडे असलेली कला आणि त्यामधील कलावंत नेहमी जिवंत ठेऊन जीवनाचा आनंद सदैव तेवत ठेवावा, असे उद्गार अकोल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी पत्रकार आणि कीर्तनकार राजकुमार उखळकर यांनी क
.
अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी होते. मंचावर उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार, सचिव डॉ. सत्यनारायण बाहेती, सहसचिव प्रमोद देशमुख, विनायक पांडे, नारायण अंधारे, गुरुचरणजीतसिंग सेठी, दिलीप पांडे उपस्थित होते.
सर्वप्रथम मागील महिन्यात दिवंगत झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळेस संघाचे माजी अध्यक्ष अशोक कुलकर्णी यांनी स्व. वामनराव संगवई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून संघाच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता असे सांगून आदरांजली अर्पित केली. आइस्कनचे अध्यक्ष प्राचार्य व्ही. के. भदाणे यांच्या निधनाबद्दल विनायक पांडे यांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. प्रमुख अतिथी राजकुमार उखळकर यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
प्रास्ताविकात सचिव डॉ. सत्यनारायण बाहेती यांनी वर्षभरात ज्येष्ठ नागरिक संघाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. यानंतर बैसाखीनिमित्त गुरूचरणजीतसिंह सेठी यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मार्च आणि एप्रिल महिन्यात ज्या सदस्यांचा वाढदिवस होता त्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अतिथींचा परिचय आणि सूत्रसंचालन सचिव डॉ. सत्यनारायण बाहेती आणि प्रभाकर देशपांडे, आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष कन्हैया चेंन केशला, सुनील खोत, संध्या संगवई, निशा कुलकर्णी, सुमन शहा, भरत आदींनी सहकार्य केले. संघाच्या आजी-माजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह महिला आणि पुरुष सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकुमार उखळकर यांनी “माझ्या आयुष्यातील किस्से’ सांगताना विनोदप्रचूर भाषेत आणि कृती करून सतत तासभर प्रेक्षकांना हसत ठेवले. घरातील धुनीभांडीपासून साफसफाईपर्यंत सर्वांच्याच अनुभवातील किस्से त्यांनी उलगडले. कोरोना काळातील अनुभव आणि क्रिकेट मॅच खेळताना कथ्थक नृत्यात कसे खेळले जाते तेही ॲक्शनसह विशद केले. त्यांचे अनुभव सर्वांना खळखळून हसवणारे ठरले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाद्वारे करण्यात येत असलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल आनंद व्यक्त केला.
[ad_2]